पुणे: ‘आरआर काबिल फाउंडेशन’च्या ‘रोशनी’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वंचित तरुणांना
सक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिशियन दिनाच्या निमित्ताने एक विशेष प्रशिक्षण प्रकल्प आयोजित करण्यात
आला आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुणांना विद्युत क्षेत्रातील सर्वसमावेशक तांत्रिक प्रशिक्षण, संवाद व सॉफ्ट स्किल्स
देणे आणि नोकरी मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक तो आधार देणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा तीन महिन्यांचा
प्रशिक्षण कार्यक्रम मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान
राबविण्यात येणार आहे.
तीन महिन्यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात युवकांना प्रत्यक्ष कामाचे ३०० तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी
कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज (फ्युएल) आणि रुस्तमजी अॅकॅडमी फॉर
ग्लोबल करिअर्स (आरएजीसी) यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली आहे. हा उपक्रम दहावी उत्तीर्ण असणाऱ्या
आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या तरुणांसाठी खुला आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना ‘इलेक्ट्रिकल टूलकिट’ देण्यात येणार आहे. त्यामध्ये टी-शर्ट्स, बॅग,
अभ्यासाची सामग्री आणि एक इलेक्ट्रिकल टूलकिट यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात या
साहित्यामुळे मदत होणार आहेच, त्याशिवाय त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन, रोशनी परिवाराचा भाग
असल्याचा अभिमान त्यांना वाटेल.
“खरा बदल संधीने सुरू होतो, असा आमचा विश्वास आहे,” असे ‘आरआर ग्लोबल’च्या संचालिका कीर्ती काबरा यांनी
सांगितले. “तरुणांना आवश्यक ती तांत्रिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये देऊन, केवळ त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या
कुटुंबियांच्याही उज्जवल भविष्यासाठी रोजगाराचा सशक्त पर्याय तयार करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,” असेही त्या
म्हणाल्या.
विद्युत उद्योगात आघाडीवर असलेल्या ‘आरआर काबिल’ने कुशल मनुष्यबळाच्या महत्त्वाची जाणीव ठेवत हा उपक्रम
सुरू केला आहे. त्यातून या उद्योगाची वाढ आणि राष्ट्रीय हित या बाबी साध्य होणार आहेत. ‘आरआर काबिल
फाउंडेशन’च्या सर्वसमावेशक विकासाच्या कटिबद्धतेतून जन्माला आलेला रोशनी उपक्रम हा केवळ प्रशिक्षण देणारा
प्रकल्प नसून, वंचित पार्श्वभूमीतील तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि भारताच्या विकासाचे ते एक
स्वप्नही आहे. उत्तम प्रशिक्षण आणि नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देऊन, आरआर काबिल एक
समावेशक मनुष्यबळ घडविण्यास मदत करीत आहे. प्रत्येक तरुणाला स्वतःचा उत्कर्ष साधण्याची आणि समाजात
अर्थपूर्ण योगदान देण्याची संधी यातून मिळणार आहे.
या उपक्रमातून किमान ५० टक्के प्रशिक्षित उमेदवारांना स्थिर रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य असून, भारतात कुशल
इलेक्ट्रिशियन व टेक्निशियनसाठी वाढत्या मागणीला उत्तर देणारा महत्त्वाचा टप्पा तो ठरणार आहे. देशाच्या विकासात
हे एक मोठे योगदान ठरणार आहे.
या उपक्रमासाठी ‘आरआर काबिल फाउंडेशन’ने ५३ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. शिक्षण, रोजगार आणि
सबलीकरणाच्या माध्यमातून समाजोन्नतीसाठी घेतलेली ही दृढ कटिबद्धता त्यातून अधोरेखित होते. ‘रोशनी’
उपक्रमाच्या माध्यमातून केवळ काही युवकांना प्रशिक्षण देण्याचा नव्हे, तर भविष्यातील भारतासाठी ऊर्जा देणारी
सक्षम पिढी घडवण्याचा संकल्प हाती घेतला गेला आहे.
‘आरआर काबिल फाउंडेशन’च्या ‘रोशनी’ उपक्रमातर्फे महाराष्ट्रातील वंचित तरुणांसाठी कौशल्यविकासाचा विशेष प्रकल्प सादर
Date:

