बासी ईदला सारसबाग खासदार मेधा कुलकर्णींच्या आदेशाने महापालिकेने ठेवली बंद
सारसबागेत मांसाहार चालणार नाही – हिदुत्ववादी संघटनांची भूमिका

पुणे- पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्या नंतर आता भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कट्टर हिंदूत्ववादी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत . मेधा कुलकर्णी यांनी मध्यंतरी एका मशिदीतील आवाजा विरोधात उठविलेला आवाज , नंतर हडपसरच्या आमदाराने मंगळवार पेठेत एका मुस्लीम प्रर्थानास्थळातील अतिक्रमणाविषयी केलेले आंदोलन या सर्व पार्श्वभूमीवर आता अशा घटनेत बासी ईद ला सारस बाग बंद ठेवण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. हिंदुत्ववादी संघटनानी सारस बागेत मांसाहार चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
पुण्याच्या राज्यसभा सदस्य असलेल्या खासदार यांनी दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने रविवारी सारस बाग बंद ठेवल्याने महाराष्ट्र मुलीम कॉन्फरन्स ने थेट महापालिका आयुक्त यांना मुस्लीम विरोधी ठरवून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात मुलीम कॉन्फरन्स चे हाजी फरीद खान आणि हाजी जुबेर मेमन यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे …
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम हटाव मोहीम
बासी ईद निमित्त पुणे शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने कुटुंबासमवेत सारसबागेत येत असतात दिवसभर खेळीमेच्या आणि हास्य विनोदाने वेळ घालवत असतात गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा कायम चालू होती मात्र आजच्या बासी ईदला सारसबागेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते परिणामी मुस्लिम बांधवांना सारसबागेत जाता आले नाही त्यामुळे मुस्लिम बांधवात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती प्रथमच अशा प्रकारचा अनुभव मुस्लिम बांधवांना आला पण सारसबाग बंद का आहे याबाबत नागरिकांना सकाळी समजू शकले नाही याबाबत महापालिकेशी संपर्क केला असता राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे समजले आहे आयुक्तांनी त्या पत्राच्या आधारे आज दिनांक 8 जून रोजी सारसबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती आजच्या दिवशी मुस्लिमच बांधवच नाही तर इतर समाजातील नागरिक ही सारसबागेत येत असतात त्यांचीही गैरसोय झाली होती नव नियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बासी ईदला जाणून बुजून सारसबाग बंद ठेवून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत अशा जातीवादी महापालिका आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फेरन्सच्या वतीने घेण्यात आली असून उद्या सकाळी सोमवार दिनांक नऊ रोजी दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ आयुक्तांना हटवण्याची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या सारस बाग लक्षवेधी हिंदूंचे श्रद्धास्थान –मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रिकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते
दरम्यान या संदर्भात भाजपच्या नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठाम भूमिका घेत महापालिका आयुक्तांना पत्र दिल्याने सारस बाग बंद ठेवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नेमके या पत्रात काय म्हटले होते ते जसेच्या तसे त्यांच्याच शब्दात …
मा. महापालिका आयुक्त, पुणे, मनपा पुणे.
विषय: सारसबागेमध्ये दिनांक 8 जून या दिवशी बाशी ईद साजरी करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली आहे. त्याविरुद्ध हिंदू संघटनांनी केलेल्या तक्रारी संदर्भात.
महोदय,
सारसबागेमध्ये श्री सिद्धिविनायकाचे पेशवेकालीन मंदिर असून हे लक्षावधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराभोवती एक उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये बकरीईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येत उपस्थित राहतो आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून त्या ठिकाणी मांसाहारी भोजन करण्यासाठी डबे आणले जातात या गोष्टीमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे विविध हिंदू संघटना आक्रमक झाले असून त्यांनी 8 जूनला सारसबागेमध्ये सामाजिक एकत्रीकरणाचा उपक्रम करण्याचेही ठरवले आहे. यामुळे दोन्ही समाज समोरासमोर येऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हिंदू समाजाच्या या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे दिसते कारण अनेक मुस्लिम लोक या ठिकाणी एकत्रिकरण करून मांसाहार करतात आणि त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते आहे. ही गोष्ट सहन करण्यासारखी नाही.
त्यामुळे दिनांक 8 जून या दिवशी सारसबाग उद्यान बंद ठेऊन फक्त मंदिरात भाविकांना जाण्याची मुभा राहिली तर संभाव्य अनुचित प्रकार टळून सार्वजनिक शांततेचे यथायोग्य पालन होईल तरी याबाबत तातडीने आदेश द्यावेत.
या दिवशी हिंदू भाविकांसाठी मात्र मंदिर खुले राहणे अत्यावश्यक आहे याची नोंद घ्यावी.
धन्यवाद.
प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी,
खासदार राज्यसभा.
मोबाइल क्रमांक 9422037306
