दिल्ली : 6 जून: सरहद, पुणे संस्था आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने सरहद शौर्यथॉन – 2025 या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियल गेट येथे करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कर आणि सरहद यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्यांदा झोजिला युध्द विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्यथॉन-2025 (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतासह जगातील विविध देशातील अंदाजे 2000 पेक्षा अधिक धावपटू भाग घेणार आहेत.
सन 2017 पासून गेली आठ वर्षे, दरवर्षी सरहदच्या वतीने सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल (लडाख) येथे केले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने सरहद संस्थेला, 22 जून 2025 रोजी होणार्या या ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे.
या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी 21 किमी (हाफ मॅरेथॉन) कारगिल व्हीक्टरी रन, 10 किमी (पुरुष व महिला) टायगर हिल व्हिक्टरी रन, 5 किमी अंतराच्या स्पर्धा 15 वर्षावरील मुले व पुरुष गट (एकत्र) आणि 15 वर्षावरील मुली व महिला गट (एकत्र) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच शालेय मुले-मुली विद्यार्थ्यांसाठी (15 वर्षा आतील) 3 किमी अंतराची फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे .
या स्पर्धेतील विजेत्यांना रू.3 लक्ष 28 हजार रुपयांची लाखांची रोख पारितोषिके संयोजन समिती तर्फे देण्यात येणार आहेत.
वरील स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धक (बीब) क्रमांक टी शर्ट, मेडल, सहभाग सर्टिफिकेट, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, स्नॅक्स इ. देण्यात येणार आहे. ही स्पर्धा वर्ल्ड अॅथलेटिक्स फेडरेशन आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या नियमानुसार होतील.
हिमालयातील पर्वत रांगांमधून जाणार्या आणि अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या या स्पर्धामार्गावर नियमानुसार तांत्रिक अधिकारी, रिफ्रेशमेंट बूथ, पिण्याच्या पाण्याचे बूथ, वैद्यकीय व्यवस्था, अद्ययावत अँब्युलनसेस, मार्गदर्शक, अंतराचे बोर्ड्स, मोटार सायकल पायलट्स आणि सायकल पायलट्स असतील. संपूर्ण स्पर्धा मार्गावर लडाख ट्रॅफिक पोलिसांचे नियंत्रण आणि बंदोबस्त तसेच भारतीय लष्कराचे बिनतारी संदेश नियंत्रण व्यवस्था करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी पाहुणे म्हणुन भारताचे रक्षा राज्यमंत्री संजय सेठ तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संस्थेने निमंत्रण दिले आहे.
ज्यांना सरहद शौर्यथॉनसाठी द्रास येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी वर्च्युअल सरहद शौर्यथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अशा धावपटूंनी संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी. त्यानंतर 22 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून कोणत्याही वेळेस आपल्या गटानुसार धावून त्याचे रेकॉर्ड (व्हिडिओ, फोटो, अंतर, वेळ आणि GPS डेटा यासह) आयोजकांकडे पाठवायचे आहे.
भारतीय सेनेप्रती आपल्या धावातून सर्वोत्तम कृतज्ञता व्यक्त करणार्या 100 निवडक धावपटूंना सरहद शौर्यथॉनची अधिकृत जर्सी पाठवण्यात येईल.
प्रमाणपत्र व जर्सीसाठी पात्र ठरण्यासाठी मूळ आणि विश्वासार्ह GPS रन डेटा अनिवार्य आहे
नोंदणी साठी संकेतस्थळ : www.sarhadkargilmarathon.com
ही माहिती लेशपाल जवळगे यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकारांना दिली.
कारगिलच्या सरहद शौर्यथॉन स्पर्धा संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत …लेशपाल जवळगे यांची माहिती
Date:

