पुणे, दि. ६ जून २०२५ : सह्याद्री प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या “शिकणारे पालक घडणारी मुलं” या अस्मिता जोशी-राजे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मोंडकर सभागृह, एस. एम. जोशी फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विशेष उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे आणि मासिक ‘जडण-घडण’चे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकात आधुनिक पालकत्व, मानसिक आरोग्य, व मुलांच्या सर्वांगीण विकासावर सखोल विचार मांडण्यात आले आहेत. शिक्षण, आधुनिक पालकत्व आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असा विश्वास सह्याद्री प्रकाशनच्या संचालक सौ. स्मिता देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वाचनप्रेमी, पालक आणि शिक्षकांनी या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

