पुणे-
कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रिटी अथवा मान्यवर व्यक्तींना न बोलावता पहलगाम हल्यात शहीद झालेल्या जगदाळे कुटुंबीय, गणबोटे कुटुंबीय, हुंडाबळी प्रकरणातील बळी ठरलेली स्मृतीशेष वैष्णवी हगवने यांच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना अभिषेक करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर येथील श्री शिवाजी वैदिक विद्यालयातून अभ्यास करून महंत कैलास वडघुले कुमारी स्वरा धुमाळ यांनी राज्याभिषेक विधी संपन्न झाला. या प्रसंगी शस्त्र पूजन, धान्य पूजन, फळांचे पूजन, जगद्गुरु संत तुकाराम महाराज्यांच्या गाथेचे पूजन, छत्रपती शिवरायांच्या नित्य वापरात वापरत असलेल्या कवड्याच्या माळीचे पूजन, शिवमुद्रेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिल्पकार सौ.सुप्रिया शेखर शिंदे, ॲड.प्राजक्ता मोरे, पत्रकार चंद्रकांत फुंदे यांना शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीचे विकास पासलकर यांनी प्रास्ताविक केले पासलकर म्हणाले व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या या कुटुंबातील सदस्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश शिवराज्याभिषकाच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न आम्ही आखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून करत आहोत. शिवराजाभिषेकासाठी मोहन जोशी, माधव जगताप, संदीप कदम, राजेंद्र डुबल, संदीप खलाटे, निलेश निकम, मारुतराव सातपुते, रमेश गुजर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सचिन जोशी, मंदार बहिरट, रोहित ढमाले, युवराज ढवळे यांनी परिश्रम घेतले
सूत्र संचालन विराज तावरे यांनी केले तर प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले.

