पुणे : स्त्री सन्मान व तिचे स्वतंत्र अस्तित्व यासाठी स्व.नानाराव ढोबळे हे सत्तरच्या दशकात जागरूक होते त्यातूनच “भारतीय स्त्रीशक्ती जागरण” या संघटनेचा प्रारंभ झाला असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत वैचारिक समूह प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी येथे बोलताना काढले.
भारतीय स्त्रीशक्ती जागरण यांच्या वतीने आयोजित “एकता” मासिकाच्या ज्येष्ठ संघ प्रचारक स्व.नानाराव ढोबळे विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले की,
त्या काळात विवाह करताना मुलींच्या पसंतीला अग्रक्रम द्यावा यासाठी नानाराव आग्रही होते. स्त्रीच्या शक्तीची जाणीव तिला स्वतःला करून देणे, त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न केवळ त्यांचे नसून ते स्त्री- पुरुष दोघांचे असतात असे नानारावांचे प्रतिपादन होते.संघ परिवारातील महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महिलांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा व उपक्रम सुरू करावे यासाठी “महिला समन्वय” या मंचाचा प्रारंभ त्यांच्या प्रेरणेने झाला.
नानाराव यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले की, संघकार्याच्या विस्तारासाठी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करताना नानाराव यांनी संवेदनशील मन व त्याला कल्पकतेची जोड यातून धुळे जिल्ह्यातील जनजाती बांधवांच्या सहकारी शेतीच्या प्रकल्पाद्वारे त्यांना स्वावलंबी बनवले.
दृष्टि स्त्री अध्ययन केंद्राच्या संस्थापक कार्यवाह अंजलीताईं देशपांडे यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यांनी नानाराव ढोबळे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
“एकता” मासिकाच्या संपादक रुपाली भुसारी यांनी मनोगत व्यक्त केले.
स्त्री शक्ति जागरण च्या पहिल्या कार्यकारिणीतील कोषाध्यक्ष विनया मेहेंदळे आणि मा. अलका जोगळेकर (डोंबिवली) यांनी नानांच्या आठवणी सांगितल्या.
स्वागतगीत संध्या कुलकर्णी आणि गीता कुंभोजकर यांनी गायले. प्रास्ताविक अध्यक्ष किर्ती देशपांडे आणि आभार प्रदर्शन सचिव सुनिती पारुंडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संध्या देशपांडे,
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

