मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली मधील प्रकार
पुणे–दुपारी झालेल्या अभियांत्रिकीच्या पेपरच्या, दिलेल्या उत्तरपत्रिका रात्री पुन्हा देऊन त्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्याचा कारभार करणाऱ्या सातव नावाच्या प्राध्यापकाला पुणे पोलिसांनी रंगे हाथ पकडले आहे. प्रतिक किसन सातव वय ३७ वर्षे रा.केसनंद वाघोली, पुणे असे या प्राध्यापकाचे नाव असून सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, रोख रक्कम २,०६,०००/- रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावी असे मुद्देमालसह आणि विद्यार्थ्यांसह ते रंगेहाथ पकडले गेले .
पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०२/०६/२०२५ रोजी युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे, यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, बायफ रोड, वाघोली, पुणे येथील मेकॅनिकल इंजिनियरींग कॉलेजचे प्राध्यापक नामे प्रतिक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षाचा इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ हा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याकडुन पैसे घेवुन पुन्हा पेपर लिहिण्यासाठी देणार आहे.
सदर प्राप्त गोपनीय माहीतीचे अनुषंगाने दि.०३/०६/२०२५ रोजी युनिट ६ पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, सदर कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनियरींग कॅडकॅमचे प्राध्यापक १) प्रतिक किसन सातव वय ३७ वर्षे रा.केसनंद वाघोली, पुणे २) आदित्य यशवंत खिलारे वय २० वर्ष रा. वाघोली पुणे. ३) अमोल आशोक नागरगोजे, वय १९ वर्ष, रा. वाघोली पुणे ४) अनिकेत शिवाजी रोडे, वय २० वर्ष रा. वाघोली पुणे हे सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, रोख रक्कम २,०६,०००/- रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावी असे मुद्देमालसह मिळुन आले.
तसेच सदर ठिकाणी पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली पुणे या कॉलेजमधे शिकणारे प्रथम वर्षाचे एकुण ०८ विदयार्थी मिळुन आले. नमुद प्राध्यापक व त्याचे साथीदार यांनी विद्यार्थ्यांना इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरुन त्यांचे कडुन स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता संगनमत करुन १० ते ५० हजार रू. स्विकारले आणि पार्वतीबाई गेणबा गोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली या कॉलेमधील परिक्षा कंट्रोल रुमची बनावट चावी बनवुन त्या चावीद्वारे कॉलेमधील परिक्षा कंट्रोलरुम उघडून त्यामधील इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या उत्तरपत्रिकेचे सहा सिलबंद बंडल काढून घेवुन विद्यार्थ्यांना त्यांची मुळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहीण्यासाठी देवुन शासनाची फसवणुक केली. म्हणुन त्यांचे विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २२६/२०२५भा. न्या. सं.क.३०३ (२), ३१८ (२),३१८ (३),३१८ (४),६१ (२) सह सार्वजनीक परिक्षा (आयोग साधनांचे प्रतीबंध) विधेयक २०२४ चे कलम ४,५,१०,११ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पुणे शहर निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १), गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कारखेले, सकटे, तांबेकर, काटे, डोंगरे, व्यवहारे, ताकवणे, धाडगे, मांदळे, पानसरे यांनी केली आहे.

