· एयर इंडियाच्या प्रवाशांना ६ देशांतील १६ ठिकाणी प्रवास करता येणार
गुरुग्राम, ३ जून २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने उदयोन्मुख बाजारपेठांतील चार प्रमुख विमान कंपन्यांसह इंटरलाइन भागिदारी केल्याची घोषणा केली. यामुळे युरोप विशेषतः बाल्टिक प्रदेश आणि पूर्व युरोप तसेच मध्य आशियातील प्रदेशांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
या भागिदारीमुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना या भागातील ६ देशांतील १६ ठिकाणी जास्त सहजपणे प्रवास करता येणार असून संबंधित भागीदार विमानकंपन्यांच्या प्रवाशांसाठी भारतात येणं सोप होणार आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या ८१ व्या आयटा एजीएममध्ये एयर इंडियाने एयरबाल्टिक, बल्गेरिया एयर, सायप्रस एयरवेज, उझबेकिस्तान एयरवेज यांच्याशी इंटरलाइन करार केले.
नव्या भागिदारींमुळे एयर इंडियाचे जागतिक कनेक्टरचे स्थान आणखी मजबूत होणार असून प्रवाशांना एकाच तिकाटावर वेगवेगळ्या खंडात भागीदार विमान कंपन्यांसह तसेच सुनियोजित बॅगेज अलावन्स आणि हाताळणीसह प्रवास करता येणार आहे.
४ भागीदार विमान कंपन्यांसह सोयीस्कर वन- स्टॉप कनेक्टिव्हिटी:
· एयरबाल्टिक: रिगा (लॅटव्हिया), टल्लिन (इस्टोनिया) आणि व्हिलनियस (लिथुअनिया) या ठिकाणी एयर इंडियाच्या अमस्टरडॅम, पॅरिस, कोपेनहेगन, फ्रँकफर्ट, लंडन गॅटविक, मिलान- मालपेन्सा, व्हिएन्ना, झुरिच किंवा दुबईतील गेटवेद्वारे प्रवेश मिळणार आहे.
· बल्गेरिया एयर: एयर इंडियाच्या लंडन हिथ्रो, पॅरिस, अमस्टरडॅम, फ्रँकफर्ट, मिलान, झुरिच आणि तेल अविव येथे असलेल्या गेटवेजग्वारे सोफियासारख्या पूर्वीय युरोपिय शहरात प्रवास करणे शक्य होईल. एयर इंडियाच्या प्रवाशांना सोफिया ते वर्ना आणि बुरगाससारख्या इतर बल्गेरियन शहरांत प्रवास करणेही सोपे होणार आहे.
· सायप्रस एयरवेज: लार्नाका (सायप्रस) इथे एयर इंडियाच्या पॅरिस, मिलान आणि दुबई येथील युरोपीय गेटवेजद्वारे प्रवेश मिळणार असून त्यामुळे भारतीय प्रवाशांना मेडिटेरियनमधल्या या प्रमुख सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्राला भेट देणे शक्य होईल.
· उझबेकिस्तान एयरवेज: दिल्ली, मुंबई आणि गोवा- मोपा (जीओएक्स) येथून ताश्कंदला प्रवास करता येईल तसेच ताश्कंद ते बुखारा, कार्शी, नुकुज, उर्गेन्च, तेरमेझ, समरकंद, फर्गाना आणि नामागन या ठिकाणी कनेक्शन्स मिळतील.
एयर इंडियाद्वारे चार भागीदार विमानकंपन्यांच्या प्रवाशांना ३० पेक्षा जास्त भारतीय शहरांत प्रवास करणे शक्य होणार असून त्यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद, अमृतसर, गोवा आणि कोचीसह बऱ्याच शहरांचा समावेश आहे.
या चार नव्या इंटरलाइन भागिदारींमुळे एयर इंडियाची व्याप्ती जगभरात विस्तारणार असून त्यामुळे आजच्या सर्वात महत्त्वाच्या उद्योन्मुख बाजारपेठा व शहरांत प्रवेश करणे शक्य होणार आहे, असे एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले. ‘एयरबाल्टिक, बल्गेरिया एयर, सायप्रस एयरवेज आणि उझबेकिस्ना एयरवेज यांच्यासह करण्यात आलेल्या भागिदारीमुळे प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि आमच्या वाढत्या प्रवासी वर्गाला सहजपणे जगभरात प्रवास करणे शक्य होईल. यामुळे जागतिक विमानवाहतुकीचे केंद्र असे भारताचे स्थानही आणखी मजबूत होईल.’
या इंटरलाइन कनेक्शन्सचे बुकिंह एयर इंडियाचे संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे लवकरच खुले होईल.

