राष्ट्रनिर्मिती आणि विश्वशांतीसाठी डॉ. कराड यांचे कार्य अतुलनीय

Date:

अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मधू कृष्णन यांचे विचार
डॉ. कराड ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कारा ने सन्मानित
पुणे दि. ३ जून :
“सृष्टीवर वाढत जाणार्‍या आतंकवादी घटना, नरसंहारामुळे मानव जात अशांतीच्या दलदलीत अडकली आहे. त्यातच धर्माच्या नावाने सर्व मानवजाती विखुरलेल्या आहेत. अशा वेळेस डॉ. कराड हे विश्वशांतीसाठी करीत असलेले कार्य मानव कल्याणासाठी आहे. तसेच राष्ट्रनिर्मिती आणि विश्वशांतीसाठी विद्यार्थ्यांना जोडून त्यांचे योगदान कसे घेता येईल यावर सर्वांनी कार्य करावे.” असे विचार अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य रेक्टर प्रो.डॉ. मधू कृष्णन यांनी व्यक्त केले.
यूएसए येथील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसची एक टीम पुण्यात येऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
तसेच द अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसए यांच्या वतीने ‘प्रॉपेनंट ऑफ ग्लोबल पीस अवार्ड २०२५’, ‘सर्टीफिकेट ऑफ एक्सीलेन्स’,‘बेस्ट नॅशनल बिल्डर्स लिडर्स अ‍ॅवार्ड २०२५’ आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस यांच्या वतिने ‘पीस अ‍ॅम्बेसेड ’ हे सन्मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. विश्वनाथ कराड यांना ‘इंटरनॅशनल डिप्लोमॅटचे कार्ड’ देण्यात आले. हे १२० देशात लागू आहे. त्यामुळे डॉ. कराड हे आंतरराष्ट्रीय व्यक्ती झाले आहेत.
याप्रसंगी अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बिजॉयकुमार दास, बिशप अनिष विजागर, फ्रिडम फाउंडेशन बंदिजन सुधारणा व पूर्नवसन केंद्राचे संस्थापक व बिशप प्रदीप वाघमारे आणि उच्च न्यायालयाचे अ‍ॅड विपीन बावर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रा.डॉ. मधू कृष्णन म्हणाले, “विश्वशांतीसाठी जगणे, वागणे आणि त्याला व्यवहारात आचरण करणारे डॉ. कराड हे चालते फिरते विश्वशांतीचे राजदूत आहेत. शांती निर्मितीसाठी युनाइटेड नेशन खूप मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत. त्याचवेळेस डॉ. कराड यांनी डोमची निर्मिती करून सृष्टीवर शांती स्थापीत करण्याचे कार्य करीत आहेत.”
“उच्च शिक्षित लोकांकडूनच बर्‍याच वेळा हुंडा घेतला जातो. त्यामुळे सर्वांनी अशी शपथ घ्यावी की हुंडा घेणार नाही आणि देणार नाही. यामुळे होणारे अत्याचार थांबून, विश्वशांतीच्या दिशेने पाऊल उचलले जातील असेही ते म्हणाले.”
सत्कारानंतर उत्तर देतांना प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“मानवतेचे कल्याण हे शांतीमध्ये दडलेले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाच्या आधारे जगात विश्वशांती येऊ शकते. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून कुटुंब, समाज, देश आणि सृष्टीसाठी कार्य करावे. विश्वशांती निर्मित डोम हा मोठा नाही तर त्यातून दिला जाणार संदेश हा सर्वात मोठा आहे.”
डॉ. बिजॉय कुमार दास म्हणाले,“जे गुरू असतात ते साक्षात ईश्वरांचे स्वरूप असतात. विश्व गुरूच्या रूपात डॉ. कराड यांच्याकडे पाहतो. पूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखे गुण त्यांच्यात दिसतात. त्यांनी आळंदी, विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रूई या गावाचे परिवर्तन केले आहे.”
डॉ. मिलिद पांडे म्हणाले,“चार दशकांहून अधिक काळ शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्म, जागतिक शांती, सांप्रदायिक सद्भाव, वैश्विक बंधुत्व आणि इतर क्षेत्रात अहोरात्र कार्य करणारे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे खर्‍या अर्थाने विश्व शांतीचे राजदूत आहेत.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी डॉ. कराड यांच्या शिक्षण, अध्यात्म आणि विश्वशांतीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच अ‍ॅड. विपीन बावर यांनी सांगितले की देशाच्या विकासासाठी शांती अत्यंत महत्वपूर्ण आहे. बिशप प्रदीप वाघमारे यांनी स्वागतपर भाषण सांगितले की शांती करणारे ते धन्य कारण त्यांना ईश्वराचे मुले असे पृथ्वीवर गणले जाईल.
प्रा. डॉ. आशिष पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने...

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...