पोलिसांनी तातडीने दोषी अधिकाऱ्यांना अटक करण्याची जोरदार मागणी
नाना पेठ येथे डोके तालीम परिसरात वीज खांबामध्ये उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून एका सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला आहे. रविवारी (दि. १) घडलेल्या या घटनेतील वीजखांब हा पथदिव्याचा आहे. सदर पथदिव्याचा वीजपुरवठा तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे. या दुर्दैवी घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
पुणे : विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून आठ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. नाना पेठेतील डोके तालीमजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली. सायली डंबे (वय ८, रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार , सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्या वेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलाला विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल उपचार करण्यात आले. उपचारांदरम्यान सायलीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नाना पेठ परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
“शाळकरी मुलीचा विजेचा धक्क्याने मृ्त्यू प्रकरणी महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली. याबाबतचा अहवाल महावितरणकडून आल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.”-उमेश गित्ते, वरिष्ठ निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

