पुणे:शहरात अशी अनेक वाईन शॉप आहेत कि ज्यांच्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला व्यत्यय येऊन वाहतूक कोंडी होते अशी दुकाने बंद करा अशी मागणी आता होऊ लागली असताना धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौकातील दारुची दुकाने बंद करण्यासाठी धायरी ग्रामस्थांच्या वतीने आज रविवारी प्रसिद्ध उंबऱ्या गणपतीची महाआरती करण्यात आली.वाहतूक कोंडी, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारी दारूची दुकान बंद होई पर्यंत श्री ची महा आरती सुरू ठेवण्याचा निर्धार सर्व पक्षीय ग्रामस्थांनी केला आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, दाट लोकवस्तीतील दारुच्या दुकानामुळे कायदा सुव्यवस्था वाहतूक आदी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. खासदार , आमदार जिल्हाधिकारी आदींना अनेक निवेदने देऊन सरकारने दखल घेतली नाही. दुकाने बंद करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी करुनही मतदान घेतले जात नाही.ड्राय डे च्या दिवशीही दुकाने सुरू असतात.छोटी कारवाही करून प्रशासन वेळकाढूपणा करत आहेत. दारू दुकाने कायमस्वरूपी बंद करे पर्यंत लढा सुरू राहणार आहे.
महा आरती आंदोलनात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती पोकळे,महादेव पोकळे, अँड . राजेशाही मिंडे, , सनी रायकर,, राजेश पोकळे, अरुण अण्णा गायकवाड ज्ञानेश्वर कामठे आदी सहभागी झाले होते.

