एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित
‘कम्यूनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अॅण्ड डेव्हलपमेंट’ परिषदचे उद्घाटन
नाशिक,: कष्ट करण्याची तैयारी, सचोटी, प्रामाणिकता, विश्वास, जे बोलेल तसेच वागावे, प्रत्येक गोष्टीचे नियोजन आणि संध्याकाळी हिशोबाचे सूत्र हे यशस्वी उद्योजक व व्यवसायिकाचे लक्षण आहे. असा सल्ला कोल्हापूर येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष ललीत गांधी यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित दोन दिवसीय ‘कम्यूनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अॅण्ड डेव्हलपमेंट’ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते.
तसेच, विनजीत टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे सह संस्थापक अश्विन कंडोई, वास्तू ग्रुप चे चेअरमन उदय घुगे, इंन्फोटेक सॉफ्टवेअर अँड सिस्टमचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशिम पाटील, नाशिक येथील सह्याद्री फर्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आर्मस्ट्रॉग डेमॅटिकचे चेअरमन विनीत माजगावकर, योगेश पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
ललित गांधी म्हणाले, ही परिषद विशेषता शेतकर्यांना उद्योजक बनविण्यासाठीचा प्रयत्न आहे. डॉ. राहुल कराड यांनी देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी व समाजाचे चांगले करण्याचा हा छोटासा उपक्रम आहे. यशस्वी व्हायचे असेल तर शेठ हिरांचद याचे चरित्र वाचण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.
डॉ. राहुल कराड म्हणाले, सध्याच्या जगात इकॉनॉमिक वॉर सुरू आहे. अशा वेळेस देशात व्यवसायात वृद्धी होणे गरजेचे आहे. या युगात वाणिज्यला बुश करण्याची गरज आहे. तसेच देशात जीतो सारखे मॉडल उभारूण प्रगती साधता येते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांशी जोडण्याचा प्रयत्न करावा.
असिम पाटील म्हणाले, व्यक्ती हा पुस्तकातून नाही तर परिस्थितितून शिकत राहतो. व्यवसायात एक चूक वारंवार करू नये. प्रामाणिक काम करतांना कर्मचार्यांबरोबर ही प्रामाणिक रहावे. या देशात आरएफआयडी कोड टेक्नॉलॉजीचा वापर सर्वच व्यक्ती करतात असे ही ते म्हणाले.
विलास शिंदे म्हणाले, सहकारांच्या तत्वावरच देशातील शेतकर्यांच्या प्रश्नांचे निराकरण करता येईल आणि हे सह्याद्रीच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. शेतकर्यांची वास्तविकता पाहता त्यांनी आंत्रप्रेन्यूअर मांइड सेट तयार करावा आणि मार्केट शोधावे.
अश्विन कंडोई यांनी जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी जागतिक विचारधारा, कर्म्फट झोन सोडणे, नवीन शिकणे, टेक्नॉलॉजीवर अधिखर्च करणे आणि ह्यूमन रिर्सार्स व ह्यूमन कॅपिटल वर खर्च करण्याचा सल्ला दिला. तसेच विनित माजगावकर यांनी ब्रॅड तयार करण्यासाठी नवनिर्मिती आणि ज्ञानाच्या आधारे शाश्वत व्यावसाय करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी पॅशन, कर्मचार्यांची काळजी घेणे, सर्वाचा आदर करण्याचे सांगितले.
यावेळी चितळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश चितळे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मिलिंद पांडे यांनी व्यवसायाचे नियम सांगितले.
उदय घुगे यांनी परिषदेची प्रस्तावना मांडली.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.
यशस्वी उद्योजकासाठी कष्ट, नियोजन व प्रामाणिकता महत्वाची-ललीत गांधी
Date:

