मुंबई -भारतीय जनता पक्षाने राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांवर आज अखेर घोषणा करत २२ नव्या नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. याअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असून, पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
याआधी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजपने जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. मात्र काही जिल्ह्यांची नावे प्रलंबित होती. अखेर आज भाजप प्रदेश कार्यालयाकडून त्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नव्याने नियुक्त करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष:
पालघर – भरत राजपूत
वसई-विरार – प्रज्ञा पाटील
अहिल्यानगर शहर – अनिल मोहिते
नाशिक शहर – सुनील केदार
नाशिक दक्षिण – सुनील बच्छाव
नाशिक उत्तर – यतीन कदम
पुणे दक्षिण – शेखर वडणे
कोल्हापूर शहर – विजय जाधव
गडचिरोली – रमेश बारसागडे
चंद्रपूर शहर – सुभाष कासमगुट्टवार
चंद्रपूर ग्रामीण – हरिश शर्मा
वर्धा – संजय गाते
परभणी ग्रामीण (शहराध्यक्ष) – सुरेश भुबंरे
छत्रपती संभाजीनगर शहर – किशोर शितोळे
तालुर शहर – अजित पाटील कव्हेकर
लातूर ग्रामीण – बसवराज पाटील
नांदेड उत्तर – किशोर देशमुख
नांदेड दक्षिण – संतुकराव हंबर्डे
बीड – शंकर देशमुख
मुंबईतील नियुक्त्या:
उत्तर पश्चिम मुंबई – ज्ञानमूर्ती शर्मा
दक्षिण मध्य मुंबई – निरंजन उभारे
दक्षिण मुंबई – शलाका साळवी
भाजपच्या या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

