पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त सारस बागेसमोरील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथाला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेसाठी कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. ज्या प्रमाणे आहिल्यादेवी लोककल्याण आणि समाज सुधारणा करीत त्याचप्रमाने लोकांमधे समानता आणण्याचे काम करीत आहिल्यादेवींनी आपल्या सैन्यामध्ये पुरुषांना संधी देत त्याचप्रमाने महिलांनाही संधी मिळत आणि म्हणुनच आहिल्यादेवींनी सैन्यामध्ये महिलांची ही एक मोठी तुकडी खास सामावुन घेतली. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती.’’
यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, नीता रजपूत, प्राची दुधाने, सीमा सावंत, हनुमंत पवार, ब्लॉक अध्यक्ष दिलीप तुपे, संतोष पाटोळे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, आबा जगताप, द. स. पोळेकर, भगवान कडू, नुर शेख, अविनाश अडसूळ, वैभव डांगमाळी, देवीदास लोणकर, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, सुमित डांगी, सचिन भोसले, प्रकाश पवार आदींसह असंख्य काँग्रेसजण अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते.

