पुणे:शहरातील सर्वात अधिक दाट लोकवस्तीच्या धायरी परिसरातील शिवकालीन वहिवाटीचे व सरकारी नकाशातील गाव पांदण,शिव रस्ते खुले करण्यात याव्यात अशी मागणी धायरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व हवेली तालुका तहसीलदारांकडे केली आहे.
धायरी येथील बहुतांश सरकारी नकाशातील शिवकालीन वहिवाटीच्या पांदण,शिव रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवाशांना ये जा करणे गैरसोयींचे झाले आहे.याकडे पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, समस्त धायरी ग्रामस्थ समितीचे निलेश दमिष्टे, सनी रायकर अनिल रायकर संदीप विठ्ठल पोकळे संतोष चौधरी अमर खेडेकर चिंतामणी पोकळे आदींनी निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,शासनाने शंभर दिवसांची मोहीम राबवुनही
धायरी गावातील अनेक पाणंद व शिव रस्ते अजुनही खुले झालेले नाहीत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहेत त्यामुळे आगामी काळात हे रस्ते खुले करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत..उपमुख्यमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिव व पाणंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. धायरी गाव हे शहरातील गाव असुन सदर गावात नागरीकरण हे प्रचंड वाढले असुन गावची लोकसंख्या दिड ते दोन लाखाच्या आसपास गेलेली आहे. रस्ते मात्र पुर्वीचेच असुन त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्यामुळे धायरी गावातील सर्व पाणंद व शिवरस्ते नागरीकांसाठी खुले करणे गरजेचे आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीनुसार धायरी गावातील सर्वच पाणंद व शिव रस्ते आपण तातडीने सरकारी मोजणी करूनबेकायदा अतिक्रमणे काढून सर्व पांदण शिव रस्ते खुले करण्याचे साकडे धायरी ग्रामस्थांनी शासनाला घातले आहे.
धायरीतील रस्ते होताहेत गायब, सरकारी पांदण,शिव रस्ते खुले करण्याची मागणी
Date:

