मुंबई, २८ मे २०२५ – आरआर ग्लोबल ग्रुप या प्रसिद्ध इलेक्ट्रिकल सोल्युशन्स कंपनीची निर्मिती असलेल्या बीगॉस या कंपनीने आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला आपला ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. भारतात वाढत्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी लक्षात घेता कंपनीने प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणसोबत केलेली भागीदारी फार महत्त्वाची मानली जात आहे. अभिनेता अजय देवगण यांची सिनेसृष्टीतील यशस्वी कारकिर्द, जनमानसातील प्रतिमा आणि लोकप्रियता बीगॉसला फायदेशीर ठरेल. बीगॉसचा स्मार्ट आणि विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार असलेली गतिशीलता हा संदेश अजय देवगण यांच्या मोठ्या चाहत्यावर्गापर्यंत पोहोचवता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.
अजय देवगण यांच्याबद्दलची जनमानसांतील मजबूत विश्वासार्हता हा स्वभावगुण बीगॉसच्या कामगिरी, विश्वासार्हता आणि विश्वासाच्या ब्रँण्ड मूल्यांशी उत्तम जुळतो. अजय देवगण यांची भागीदारी झाल्याने देशभरातील अनेक ग्राहक कंपनीशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील. यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक दुचाकीला स्मार्ट आणि जबाबदार प्रवासाचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित होतील. ही भागीदारी बीगॉसची सर्वसामान्यांसाठी सोपी आणि आकर्षकरितीने शाश्वत प्रवासाची साधने निर्मित करण्याची कटिबद्धता दर्शवते.
या भागीदारीबद्दल अभिनेता अजय देवगण यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘ बीगॉस हा भारतीय ब्रॅण्डने जागतिक दर्ज्याची इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. कंपनीच्या या यशस्वी कामगिरीमुळेच मी त्यांच्याशी जोडलो गेलो आहे. RUV350 ही दुचाकी कंपनीच्या उत्तम दर्ज्याच्या गुणवत्तेचे आणि नव्या तंत्रज्ञानाच्याबद्दलची बांधिलकीचे दर्शन घडवते. ही दुचाकी म्हणजे स्मार्ट, स्वच्छ गतिशीलतेच्या प्रवासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.’‘
अभिनेता अजय देवगण यांच्यासोबतच्या भागीदारीबद्दल बीगॉसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत काबरा म्हणाले, ‘‘आम्ही देशातील रस्त्यांवर वापरण्यास सोप्पी आणि विश्वासार्ह वाहनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमची वाहने याच गोष्टींची ग्वाही देतात. अजय देवगण यांची प्रामाणिक स्वभाव आणि मोठा चाहता वर्ग आमच्या ब्रँण्डच्या मूल्यांशी तंतोतंत जुळतो. आम्हांला विश्वास आहे की, त्यांची ही भागीदारी शाश्वत शहरी वाहतुकीला प्रोत्साहन देत कंपनीच्या व्यवसायवृद्धीस हातभार लावेल.’‘
यासह बीगॉसने ईलेक्ट्रोनिक वाहनांच्या व्यवसायात अजून काही वाहने आणण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रिक सायकल आणि आणखी दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली जातील. कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी प्रकारात सर्वात विविध प्रकारची उत्पादने (रेंज) उपलब्ध करुन देणार आहे. येत्या दोन वर्षांत डीलरशिप नेटवर्किंगमध्ये मोठा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे देशभरातील विक्री आणि सेवा मजबूत होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
बीगॉस RUV350 ही एक मजबूत, स्मार्ट, टिकाऊ आणि आरामदायक इलेक्ट्रिक दुचाकी आहे. शहरातील रस्त्यांवर तसेच लांबच्या पल्ल्यातील आरामदायी प्रवासासाठी ही दुचाकी फायदेशीर ठरते. ही दुचाकी ७५ किमी प्रति तास वेगाने धावते. दुचाकीला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १४५ पर्यंतची रेंज देते. ही दुचाकी एआरएआय प्रमाणित आहे. ३ हजार ५००W इन व्हील मोटर आणि ३ kWh LFP बॅटरी, मेटल बॉडी, १६ इंच अलॉय व्हील्स ही या दुचाकीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या दुचाकीत सामान ठेवण्यासाठी बूट स्पेसदेखील उपलब्ध आहे. प्रवासाची सर्व माहिती स्पष्ट दिसावी याकरिता ५ इंचाचा TFT डिस्प्ले, योग्य मार्ग दर्शविणारा टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल, दुचाकी पडल्यास आपोआप बंद होण्यासाठी फॉल सेन्स, प्रवासाच्या मार्गात चढण आल्यास दुचाकी मागे घसरणार नाही यासाठी हिल होल्ड, ब्रेक लावल्यावर बॅटरी चार्ज होण्यासाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम या आवश्यक सोयीसुविधांसह दुचाकी उपलब्ध आहे. स्टाईलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार झालेली ही दुचाकी प्रवासासाठी अतिशय आरामदायक आहे.
बीगॉस सी१२ या दुचाकीच्या रेंजमधील नवे मॉडेल आता दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यात TFT डिस्प्लेसह जुन्या सी१२आय मॉडेल्सची सर्व वैशिष्ट्ये एकत्रित करण्यात आली आहेत. २ हजार ५०० Wची हब मोटर, ६० किमी प्रति तासाचा टॉप स्पीड, एकदा चार्ज केल्यावर १२३ किमीपर्यंतची रेंज उपलब्ध असल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. यात काही नव्या वैशिष्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात २ थीम्ससह ५ इंचाची मोठ्या आकाराचा TFT डिस्प्ले असून २.९ kWh बॅटरी जोडली आहे. बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक लिथियम सेलचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षित प्रवासासाठीही दुचाकीत खास तरतुदी उपलब्ध आहेत. क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, फॉल सेन्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि सुरक्षित ब्रेकिंगसाठी सीबीएस ब्रेकिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल शहर आणि उपनगरातींल रस्त्यांसाठी बनवले आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या दुचाकीच्य निर्मितीला भारत व्हॅल्यू फंडचे मधु आणि महावीर लुणावत आणि विनी कॉस्मेटिक्सचे दर्शन पटले या प्रमुख गुंतवणूकदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

