राज्यातील महापालिका निवडणुका येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यानंतरच लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपाच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून भाजप कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हापरिषद नगरपरिषदांच्या निवडणुकाही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील त्यामुळे तयार राहा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत.जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणावर निधी देऊ असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. तसेच पालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका दीड महिन्यात होतील असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या. कोर्टाच्या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.अखेर आज या निवडणुकीचे संकेत मिळाले आहेत.

