गुरुग्राम,: ज्युनिपर ग्रीन एनर्जीने अंकुश मलिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.
वीज क्षेत्रात 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले अंकुश मलिक हे नेतृत्वक्षमता, धोरणात्मक अंमलबजावणी आणि सखोल औद्योगिक ज्ञान यासाठी ओळखले जातात. 12 नोव्हेंबर 2018 पासून त्यांनी ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या प्रगतिपथावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, 30 एप्रिल 2024 रोजी त्यांची मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून संचालक मंडळात नियुक्ती झाली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे कंपनीच्या शाश्वत भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा समाधान पुरविण्याच्या मिशनला अधिक गती मिळाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या नव्या भूमिकेत श्री. अंकुश मलिक हे कंपनीच्या दीर्घकालीन वृद्धीच्या धोरणाचे नेतृत्व करतील, तसेच कंपनीच्या सर्व कामकाजांवर, व्यवसाय विकासावर, प्रकल्प विकासावर, बांधकाम प्रक्रियेवर आणि नियामक बाबींवर देखरेख ठेवतील. भारताच्या विकसित होत असलेल्या नवीकरणीय ऊर्जा बाजारात आपली उपस्थिती आणि प्रभाव वाढविण्याच्या उद्दिष्टाने ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या वाटचालीत ही नियुक्ती एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना अंकुश मलिक म्हणाले, “ही जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत सन्मान वाटतो आणि माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे. भारत सध्या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे आणि अशा वेळी ज्युनिपर ग्रीन एनर्जी भारतात वेगाने वाढणाऱ्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. आपल्या सर्व भागीदारांसोबत आणि टीमसोबत काम करत दीर्घकालीन व शाश्वत मूल्यनिर्मिती करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
अंकुश मलिक हे आयआयटी दिल्ली आणि आयआयएम लखनौचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी ऑरेंज रिन्युएबल पॉवरमध्ये नेतृत्व पदे भूषविली असून, आयसीआयसीआय बँक आणि लांको इन्फ्राटेकमध्येही मोलाचा अनुभव मिळविला आहे. व्यवसाय विकास, नियामक बाबी आणि कार्यात्मक धोरण, यामध्ये त्यांना सखोल ज्ञान असून, ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत.
श्री. मलिक यांचे त्यांच्या नव्या भूमिकेत स्वागत करताना मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पराग अग्रवाल म्हणाले, “अंकुश यांची CEO पदावर झालेली बढती ही त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे नैसर्गिक extension आहे. क्षेत्रातील त्यांचा सखोल अभ्यास, अंमलबजावणीवर असलेला भर आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व या सर्व गुणांमुळे ते ज्युनिपर ग्रीन एनर्जीला पुढील वाढीच्या टप्प्यावर नेण्यासाठी योग्य निवड ठरतात. भविष्यकालीन आणि सक्षम ऊर्जा कंपनी उभारण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची मला उत्सुकता आहे.”

