ही धोरणात्मक भागीदारी भारतातील घरांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा देणाऱ्या ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे
आरोग्य आणि स्वच्छता उद्योगातील भारतातील आघाडीची कंपनी युरेका फोर्बज् लिमिटेडने त्यांच्या प्रतिष्ठेच्या व्हॅक्युम क्लिनर्सच्या श्रेणीसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरला ब्रँड अॅम्बेसडर म्हणून घोषित केले आहे. चार दशकांहून अधिक काळ लाखो भारतीय घरांमध्ये विश्वासार्हतेने सेवा देणाऱ्या या कॅटेगरी लीडरच्या या सहयोगामुळे युरेका फोर्बज्च्या स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी घेतलेल्या वचनबद्धतेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
व्हॅक्युम क्लिनिंगच्या क्षेत्रात बाजारपेठेतील अग्रणी आणि चार दशकांहून अधिक काळ जपलेल्या परंपरेसह युरेका फोर्बज्ने भारतीय घरांमध्ये नेहमीच अत्याधुनिक गृह स्वच्छता तंत्रज्ञान आणले असून त्याला अतुलनीय सर्व्हिस नेटवर्कचा आधार आहे. नवीन फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर्स शक्तिशाली सक्शन आणि वेट मॉपिंग यांचे एकत्रीकरण करून सहजतेने फरशी चकाचक करतात. AI आणि नेक्स्ट-जेन LiDAR तंत्रज्ञानाद्वारे ही स्मार्ट उपकरणे अचूकता, बुद्धिमत्ता आणि अतुलनीय सुविधा पुरवितात. श्रद्धा कपूरसोबत भागीदारी करताना युरेका फोर्बज्चे उद्दिष्ट आजच्या तरुण, शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आहे. ते स्मार्ट आणि आरोग्यदायी जीवनशैलीला महत्त्व देतात. या भागीदारीद्वारे युरेका फोर्बज् घरांना स्वच्छ आणि आरोग्यदायी उपाय सुविधांनी सक्षम करणे हे आपले ध्येय अधिक बळकट करत आहे.
युरेका फोर्बज् सोबतच्या आपल्या सहभागाबाबत बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, “युरेका फोर्बज् कुटुंबाचा भाग होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वच्छ घर हा आरोग्यदायी मन आणि शरीराचा पाया असतो असे मला नेहमीच वाटले आहे. आपण ज्या जागांमध्ये राहतो त्या आपल्या दैनंदिन कार्यक्षमतेवर मोठा प्रभाव टाकतात. युरेका फोर्बज् हा ब्रँड दीर्घकाळापासून स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करत आला आहे आणि स्वच्छ राहणीमान हे आपले कायमस्वरूपी ध्येय असलेल्या ब्रँडसोबत जोडले जाणे मला अभिमानास्पद वाटते. फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक्स सारखी नाविन्यपूर्ण उत्पादने बुद्धिमान तंत्रज्ञान आणि सहज, सुलभता यांचा मिलाफ आहेत. त्याद्वारे युरेका फोर्बज् घरगुती स्वच्छतेचे भविष्य नव्याने परिभाषित करत आहे. मला खरोखर आशा आहे की आपण एकत्र मिळून अधिकाधिक लोकांना ही जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करू शकू.”
युरेका फोर्बज् लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री. अनुराग कुमार म्हणाले, “युरेका फोर्बज् कुटुंबात व्हॅक्युम क्लिनर्सच्या ब्रँड अॅम्बेसडर म्हणून श्रद्धा कपूरचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सजग जीवनशैली, स्मार्ट निवडी आणि उद्देशपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमांना महत्त्व देणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व ती करते. या सर्व गोष्टी आमच्या ब्रँडच्या मूल्यांशी सुसंगत आहेत. युरेका फोर्बज् मध्ये आम्ही 40 वर्षांहून अधिक काळ घरगुती स्वच्छतेच्या उपाययोजनांमध्ये अग्रगण्य आहोत आणि आमच्या नवीन फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक्स रेंजसह आम्ही आजच्या घरांमध्ये सहजतेने मिळवू शकणाऱ्या स्वच्छतेचे स्वरूपच बदलून टाकत आहोत. श्रद्धाचा प्रामाणिकपणा आणि आताच्या काळातल्या भारतीय घरांशी असलेली तिची घट्ट नाळ तिला आमच्या ‘एक स्मार्ट घर, एक स्वच्छ भारत’ या प्रवासासाठी परिपूर्ण सहयोगी बनवते.”
ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनासह युरेका फोर्बज् नेहमीच अशा नाविन्यपूर्ण, सहज समजणाऱ्या आणि कार्यक्षम व्हॅक्युम क्लिनर्सद्वारे बाजारपेठेमध्ये अग्रणी राहिला आहे. हे व्हॅक्युम क्लिनर्स घरगुती स्वच्छता सुलभ आणि प्रभावी बनवतात. रोबोटिक क्लिनर्सपासून डीप-क्लिनिंग व्हॅक्युम्सपर्यंतच्या विस्तृत श्रेणीसह या ब्रँडने आधुनिक घरांच्या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार स्वतःला सतत विकसित केले आहे.

