पुणे-वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या काही दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते, अटक कशी करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून थोड्याच वेळात माहिती सांगितली जाण्याची शक्यता आहे.
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.
निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल-कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाणच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकऱणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केलीय. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक झालीय. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झालीय. वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

