- – एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त), विंग कमांडर अविनाश मुठाळ(निवृत्त) ह्यांचे मार्गदर्शन.
पुणे
केशव माधव न्यास च्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ चे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी दिनांक २४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता पटवर्धन बाग येथील ‘सेवा भवन’ सभागृहात करण्यात आले आहे.’ऑपरेशन सिंदुर ‘ वर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) व विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव माधव चे अध्यक्ष नंदाजी भागवत असणार आहेत.
भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे.
ह्या व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केशव माधव चे सचिव अरविंद देशपांडे ह्यांनी केले आहे.

