नवी दिल्ली, १९ मे २०२५: आघाडीची टियर-१ ऑटोमोटिव्ह सिस्टम्स आणि घटक पुरवठादार कंपनी ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (“LATL”), ने इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स ग्रुप (“IAC ग्रुप”) कडून आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“IAC इंडिया”) मधील उर्वरित २५% हिस्सा विकत घेण्यासाठी करार केला आहे. IAC ग्रुप, तंत्रज्ञान सहाय्य कराराच्या माध्यमातून IAC इंडियाला यापुढेही तांत्रिक पाठबळ देत राहील.
IAC इंडिया ही एक प्रस्थापित टियर-१ प्लास्टिक इंटीरियर सिस्टम्स व घटकांची पुरवठादार कंपनी आहे जी महिंद्रा, मारुती सुझुकी, फॉक्सवॅगन आणि व्होल्वो आयशर कमर्शियल व्हेईकल्स यांसारख्या भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल OEM कंपन्यांना सेवा पुरवते. IAC इंडिया ही वाहनांच्या अंतर्गत रचनेत अग्रगण्य असून महिंद्राच्या नव्याने लाँच झालेल्या BEV मॉडेल्स – BE6 आणि XEV 9e – साठी एकमेव इंटिग्रेटेड कॉकपिट आणि डोअर पॅनल्स पुरवठादार आहे. याशिवाय, ही कंपनी भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसाठी प्रगत डिझाइन आणि अभियांत्रिकी सेवा पुरवणारे एक प्रस्थापित इंजिनीअरिंग सेंटर चालवते, ज्यामुळे तिला स्पर्धात्मक फायदा मिळतो.
ल्युमॅक्स ग्रुपचे चेअरमन श्री. दीपक जैन, म्हणाले, “ही एकत्रीकरण प्रक्रिया आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनाला बळकटी देऊन भविष्यवाढीस चालना देईल. मजबूत पाया तयार करून सातत्य, कामगिरी व स्केलेबिलिटी साध्य करण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. ही घडामोड आमच्या प्रदीर्घ काळातील मूल्यनिर्मितीच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि लायटिंग, प्लास्टिक आणि इंटिरिअर्स क्षेत्रात संपूर्ण उपाययोजना पुरवण्यासाठी आम्हाला मदत करेल. तसेच यामुळे IAC इंडियामधील आमचे धोरणात्मक स्थान मजबूत होणार आहे जे महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या आघाडीच्या ओईएमच्या प्रमुख इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्मवर आमचा ठसा उमटविण्यास महत्वपूर्ण ठरेल. यामधून आमची शाश्वत गतिशीलतेबाबतची बांधिलकी दिसून येते.”
श्री. अनमोल जैन, व्यवस्थापकीय संचालक, ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज्, म्हणाले, “ही धोरणात्मक हालचाल ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीजची चारचाकी ऑटोमोटिव्ह प्लास्टिक क्षेत्रातील उपस्थिती अधिक बळकट करेल. या एकत्रीकरणामुळे खर्च नियंत्रण व संसाधनांचे शोधनियोजन साध्य होईल, ज्यामुळे पालक कंपनीच्या पातळीवर भविष्यातील धोरणात्मक व अविकसित संधींसाठी आर्थिक लवचिकता निर्माण होईल. याशिवाय, ही हालचाल नवप्रवर्तनाला गती देईल आणि प्रवासी वाहनांतील इंटिरिअर्सकडे वाढलेल्या कलामुळे दर वाहनात आमची मूल्यवर्धन क्षमता वाढवेल.”
IAC इंडिया चे देशभरात पाच उत्पादन प्रकल्प आहेत. यापैकी दोन प्रकल्प चाकण, पुणे येथे आणि प्रत्येकी एक मानेसर, नाशिक आणि बंगलोर येथे आहेत. पुण्यातील अत्याधुनिक इंजिनीअरिंग सेंटरमध्ये उत्पादन डिझाइन व इंजिनीअरिंग, डायमेन्शनल इंजिनीअरिंग, उत्पादन विकास, प्रोग्राम मॅनेजमेंट आणि टूलिंग डेव्हलपमेंट या क्षेत्रांतील कौशल्य आहे. या इंजिनीअरिंग सेंटरमध्ये ३३० अभियंते आणि डिझायनर्सचा अनुभवसंपन्न संघ आहे, जो देशी-विदेशी ग्राहकांच्या टूल डेव्हलपमेंट गरजांची पूर्तता करतो.
ही व्यवहार प्रक्रिया नेहमीच्या अटींच्या पूर्णतेच्या अधीन असून ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ल्युमॅक्सने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये IAC इंडिया मधील ७५% हिस्सा विकत घेतला होता. वरील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, IAC इंडिया ही LATL ची पूर्ण मालकीची उपकंपनी होईल. LATL कायदेशीर व नियामक अटींच्या अधीन राहून IAC इंडिया ला ल्युमॅक्समध्ये विलीनीकरण करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करेल, जेणेकरून दोन्ही कंपन्यांमधील समन्वय साधता येईल.
या व्यवहारासाठी KPMG कॉर्पोरेट फायनान्स यांनी एकमेव आर्थिक सल्लागार म्हणून भूमिका बजावली तर सिरिल अमरचंद मंगलदास हे LATL चे कायदेशीर सल्लागार होते.