तुळजापूर-तुळजाभवानी मंदिर कार्यालयात मद्यधुंदअवस्थेत सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करतपुजाऱ्याने तोडफोड केली. हा धक्कादायकप्रकार १३ मे रोजी घडला. मंदिरात गैरवर्तनकेल्याप्रकरणी देऊळकवायत कायद्यानुसारसंबंधित पुजाऱ्याला ३महिने मंदिर प्रवेशबंदीची नोटीस बजावली आहे. अनुप कदम असे तोडफोड करणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हादाखल करण्यात आला आहे.
पुजारी अनुप कदम याने १३ मे रोजीमंदिरातील व्हीआयपी गेटवर सुरक्षारक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला होता.तसेच संस्थानच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या दरवाजाला लाथ मारली. त्यामुळे दरवाजाची काच फुटली. त्यामुळे पुजारी कदम याला १३ मे रोजी ३ महिने मंदिर बंदची नोटीस बजावण्यात आली आहे. मंदिरातील तोडफोडप्रकरणी पुजारी कदम विरोधात कलम २२१, ३५२, ३२४(४) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.
यापूर्वी १५ एप्रिलला जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी संस्थान अध्यक्षांच्या दालनात कार्यालयीन कामकाज सुरू होते.त्याच वेळी पुजारी कदम याने अपरजिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक,तहसीलदारांशी हुज्जत घातली होती.या प्रकरणात सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनीचाअहवाल प्राप्त झाल्यानंतर संस्थानने सीसीटीव्हीफुटेजची पडताळणी केली, तसेच घटनाक्रमाचीखात्री केली. त्यानंतर १३ मे रोजी पुजारी कदमला‘अशोभनीय वर्तन केल्याने देऊळ कवायत कायदा कलम २४ व २५ नुसार ३ महिन्यांची मंदिर प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये ?’ अशी नोटीस पुजारी कदमला बजावली होती.

