मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!
पुणे-यंदाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात २८१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.तर २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.बारावी नंतर दहावीतही शैक्षणिक राजधानी पुणे पिछाडीवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागनिहाय SSC निकाल…
कोकण विभाग – ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के
सीबीएसईचा निकाल येथे पाहा
cbse.gov.in
results.nic.in
results.digilocker.gov.in
umang.gov.in
DigiLocker, UMANG
सीबीएसई दहावीची गुणपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सीबीएसई बारावीची गुणपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://examinationservices.nic.in/cbseresults/class_xii_jh_2025/ClassTwelfth_bn_2025.htm
निकालांमध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. दहावीच्या मुलींचा निकाल ९५.०% लागला, तर मुलांचा निकाल ९२.६३% लागला. मुलींचा निकाल मुलांपेक्षा २.३७% चांगला लागला आहे.बारावीत मुलींचा निकाल ९१.६४% आणि मुलांचा ८५.७०% लागला. याचा अर्थ असा की दोन्ही वर्गात मुली जिंकल्या आहेत.
२११ जणांना १०० टक्के
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी २११ आहेत. त्यात शंभर टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत. लातूरच्या ११३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले आहे. पुण्यातील १३ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, कोकण ९ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
राज्यात ३५ टक्के मिळवणारे २८५ विद्यार्थी कुठल्या विभागातील किती ?
नागपूर – ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर – २८ विद्यार्थी, मुंबई – ६७ विद्यार्थी, कोल्हापूर – १३ विद्यार्थी, अमरावती – २८ विद्यार्थी, नाशिक – ९ विद्यार्थी, लातूर – १८ विद्यार्थी, कोकण – ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत.
प्रथम-द्वितीय-उत्तीर्ण श्रेणीची टक्केवारी
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
१ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती.
राज्यभरातील २३ हजार ४८९ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत ९२.३१ टक्के मुले, तर ९६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ने जास्त आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याला निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के लागला.
यंदा दहावीचा निकाल का घटला याचे नेमके कारण देता येणार नाही. कारण दरवर्षी निकालात वाढ किंवा घट होतच असते. प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी कमी-जास्त होत असते. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यात ३७ केंद्रांवर गैरप्रकार घडले. आता तपासणी, चौकशी करून संबंधित केंद्रांपैकी दोषी केंद्रे कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या अभियानामध्ये भरारी पथके, बैठी पथके, आकस्मिक भेटी अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
राज्यभरातील ३७ परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे निदर्शनास आली. मात्र कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या चार विभागातील एकाही परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरण निदर्शनास आले नाही. तर पुणे, नागपूर, लातूर विभागात प्रत्येकी सात, छत्रपती संभाजीनगर विभागात तेरा, मुंबई विभागात तीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
दहावीच्या निकालात राज्यात इंग्रजी माध्यमाचा निकाल सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे. तर सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या मराठी माध्यमाचे ९२.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.राज्य मंडळातर्फे एकूण आठ माध्यमांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यानुसार मराठी माध्यमातून १६ हजार ५३४ शाळांतील १० लाख ७६ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १० लाख ६६ हजार ९०० विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ९० हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर इंग्रजी माध्यमाच्या ४ हजार ३१९ शाळांतून नोंदणी केलेल्या ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ४५ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल उर्दू माध्यमाच्या १ हजार ३०४ शाळांतून ८८ हजार ५२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ७७३ विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १४९, म्हणजेच ९३.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.
हिंदी माध्यमाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. ६१२ शाळांतून नोंदणी केलेल्या ३७ हजार २५ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३३ हजार १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कन्नड माध्यमाच्या ७८ शाळांतील २ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ हजार ५४६ विद्यार्थ्यांपैकी ९१.५२ टक्के, २ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुजराती माध्यमाच्या ४६ शाळांतून नोंदणी केलेल्या १ हजार ३१६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुजराती माध्यमाचा निकाल ९४.४४ टक्के लागला. तेलुगू माध्यमाचे ९६.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाच शाळांतून नोंदणी केलेल्या १२९ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधी माध्यमाचा निकाल ८२.६१ टक्के लागला. एका शाळेतून परीक्षा दिलेल्या २३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

