राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड प्रशिक्षणातील सूर
पुणे-, महिलांच्या प्रश्नांवर सजगपणे काम करणाऱ्या अभिव्यक्ती संघटनेने रविवार दि. ११ मे रोजी आयोजित केलेले राणी लक्ष्मीबाई ब्रिगेडने घेतलेल्या स्वसंरक्षण कार्यशाळेत उपस्थित मुली-महिलांमधील अनुराधा साठे म्हणाली की शिबिरात येण्याआधी वाटलं की हे कराटेच असेल मात्र इथली सर्व चर्चा ऐकली. प्रशिक्षित गटाने दाखवलेली प्रात्यक्षिके आणि आम्हा उपस्थितांकडून घेतलेला काहीवेळेचा सराव, यातून आत्मविश्वास वाढल्याचे वैयक्तिक पातळीवर जाणवले.

साधरणतः प्रत्येक मुली/महिलेने कधी ना कधी बसमधला धक्का, वाईट स्पर्श, वाईट नजरेने बघणे अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत. बऱ्याचदा महिला त्याला प्रतिकार करत नाहीत किंवा घाबरतात. त्या स्वतःला कमजोर समजायला लागतात. पण खरं तर त्यांना त्यांच्यातील ताकदीची जाणीव कधी कोणी करून दिलेली नाही. याच ताकदीची जाणीव करून देण्यासाठी आणि महिला व मुलींना स्वतःची सुरक्षा करण्यास सक्षम बनवण्यासाठी महिलांसाठी स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणातील प्रात्यक्षिके तयार केली आहेत, ज्यातून स्वतःतली ताकद आजमावता येते. मुळात मी स्वतः एखाद्या छेडछाड करणाऱ्या मुलाला न घबरता विरोध माझ्यातील ताकदीचा वापर करत स्वतःचे संरक्षण करू शकते हा आत्मविश्वास देणे हाच यामागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच हे प्रशिक्षण कराटे या खेळापेक्षा वेगळे आहे, असे प्रशिक्षक स्नेहल शुभांगी बाळकृष्ण यांनी सांगितले.
यावेळी साधरणा ५० ते ७० मुली महिला उपस्थित होत्या. प्रत्येकीलच आत्मविश्वास दुणावल्याचे जाणवत होते.

