नवी दिल्ली- मौनी बाबा म्हणून गेल्या पंतप्रधानांना हिणविले गेले आणि नंतर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना कधीच सामोरे न जाता मन कि बात , जनतेशी थेट संबोधन करत एक तर्फी संवाद सुरु ठेवला, मणिपूर ची दुर्घटना असेल हाथरस चा अत्याचार आणि आता भारत -पाक युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे. . शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली. यानंतर, तिन्ही सैन्याचे डीजीएमओ गेल्या तीन दिवसांपासून पत्रकार परिषदा घेत होते.पंतप्रधान , गृहमंत्री यांनी यावर आतापर्यंत मौन पाळले आहे , संरक्षण मंत्री कमीत कमी बोलले आहेत आता रात्री ८ वाजता PM मोदी काय बोलणार याबाबत आता उत्सुकता लागून आहे. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान माहिती देऊ शकतात. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून, पाकिस्तानी गोळीबारात ५ लष्कर आणि २ बीएसएफ जवान शहीद झाले आहेत आणि ६० जण जखमी झाले आहेत. याशिवाय २७ नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर २४ एप्रिल रोजी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की – पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल.दहशतवादी हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जीवनसाथी गमावला. त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड, काही गुजराती, तर काही बिहारचे होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, सर्वांच्या मृत्युबद्दलचा आपला राग सारखाच आहे.पहलगाम हल्ल्याच्या ५ दिवसांनंतर २७ एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात म्हटले होते – या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे. संपूर्ण जगाने शोक व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्यामुळे देशातील जनता रक्तबंबाळ झाली आहे. पीडित कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल.
तत्पूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी १० मे रोजी रात्री ११.३० वाजता पाकिस्तानच्या जनतेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी भारताविरुद्ध पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन ‘बुनियान-उन-मरसूस’च्या यशाचा दावा केला. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये ‘यौम-ए-तशक्कूर’ साजरा केला जात आहे. यौम-ए-तशक्कुर हा उर्दू शब्द आहे, ज्याचा अर्थ आभार मानण्याचा दिवस आहे.
शनिवारी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी लागू झाली. तथापि, ती लागू झाल्यानंतर अवघ्या ३ तासांतच पाकिस्तानने ती मोडली. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये १५ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारतीय हवाई संरक्षण दलाने हाणून पाडले.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी केला होता. यानंतर भारत आणि पाकिस्ताननेही युद्धबंदीची पुष्टी केली.

