शहरातील बड्याबड्या अनधिकृत बांधकामांकडे सर्रास दुर्लक्ष अन पोट भरणाऱ्या हातगाडीवाल्यांवर कारवाई
आयत्या वेळेला बैठकीची वेळ बदल्याचे मेसेज अन उडाला गोंधळ
पुणे, दि. १० मे: पथ विक्रेत्यांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगर पथ विक्रेता समितीने आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळेत अचानक बदल करण्यात आल्याने गोंधळ उडाला. यासाठी मनपाच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागच्या आयुक्तांना नगर पथ विक्रेता समिती टीव्हीसी सदस्य पुणे महानगरपालिकेने या पत्राद्वारे विनंती करून नगर पथ विक्रेता समितीची बैठक लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे.
पथ विक्रेत्यांशी संबधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगर पथ विक्रेता समितीची बैठक ६ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे या बैठकीची वेळ बदल्यामुळे सर्व पथविक्रेते सदस्यांमध्ये गोंधळ उडाला.
प्रशासनाकडून दुपारी ४.३० ऐवजी सकाळी ११.३० वाजता ही बैठक घेण्यात आली. यासंबंधी दूरध्वनीद्वारे अधिकृत पूर्वसूचना बहुतेक सदस्यांना केवळ एक तास आधी मिळाली. त्यामुळे नव्याने निश्चित केलेल्या वेळेत कोणतेही सदस्य उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे या बैठकीत चर्चा होऊ शकलेले मुद्दे प्रलंबित राहिले असल्यामुळे नव्याने नगर पथ विक्रेता समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करावी. अशी विनंती या पत्राद्वारे करण्याची माहिती समितीचे सदस्य सागर दहिभाते, गजानन पवार, नीलम अय्यर व कमल जगधने यांनी दिली.

