हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर–जोधपूर एक्सप्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या हस्ते ३ मे रोजी करण्यात आले. त्यावेळी हि रेल्वे सेवा ५ मे पासून सुरु होईल असे सांगण्यात आले पण त्यानंतर रेल्वे ने प्रत्यक्षात हि रेल्वे १० मे रोजी सुरु होईल असे सांगण्यात आले .परंतु आपत्कालीन व अपरिहार्य परिस्थितीमुळे खालील गाड्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे.त्यामुळे रेल्वेने प्रसिद्धीपत्रक काढून काही रेल्वे सेवा बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
रद्द व मार्ग बदललेल्या गाड्यांची नावे :
- गाड्यांचे रद्द करणे:
गाडी क्र. 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस दिनांक 10.05.2025 रोजी सुरू होणारी सेवा रद्द करण्यात आली आहे।
गाडी क्र. 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस दिनांक 11.05.2025 रोजी सुरू होणारी सेवा रद्द करण्यात आली आहे।
- मार्गातच समाप्त (शॉर्ट टर्मिनेशन):
गाडी क्र. 11077 पुणे – जम्मू तवी एक्सप्रेस दिनांक 09.05.2025, 10.05.2025, व 11.05.2025 या सेवा नवी दिल्ली (NDLS) येथे समाप्त केल्या जातील।
- मार्गातच प्रारंभ (शॉर्ट ओरिजिनेशन):
गाडी क्र. 11078 जम्मू तावी – पुणे एक्सप्रेस दिनांक 11.05.2025, 12.05.2025 व 13.05.2025 या सेवा नवी दिल्ली (NDLS) येथून सुरू होतील।
प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी 139, प्रवासी माहिती प्रणाली किंवा www.enquiry.indianrail.gov.in यावर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी. स्थानकांवर नियमित घोषणाही करण्यात येतील असे रेल्वेने कळविले आहे.

