पुणे:पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलबाबत माहिती दिली.पुण्यात विधान भवन, तळेगाव सीआरपीएफ कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयात होणार उद्या मॉकड्रिल होणार आहे. पुण्यातील विधान भवन या ठिकाणी मॉक ड्रिल होणार असल्याने या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांन केली.
पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार एक मीटिंग झाली. त्यानुसार उद्या संध्याकाळी चार वाजता पुणे विधान भवन येथे मॉक ड्रिल होणार आहे. ग्रामीण भागातही मॉक ड्रिल होणार असून सर्व विभागांचा यामध्ये समावेश असणार आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, मॉक ड्रिलचा उद्देश असा आहे की भविष्यात काही झालं तर आपली तयारी असावी. पुण्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. यात सायरन वाजवलं जाईल, या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. याची आज चाचणी केलेली आहे.सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे. हे मॉक ड्रिल आपण सुरक्षा, काळजी म्हणून घेत आहोत. विधान भवन येथील माँक ड्रिलमध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतलं जाणार असून पुण्यात तिन्ही ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रिल होणार आहे. जवळपास तीन तास मॉक ड्रिल चालेल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. आर्मी, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग ,पोलीसही यामध्ये असणार आहेत.

