पुणे:सर्वोच्च न्यायालयाने आज आदेश दिले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात हा निर्णय भारतीय लोकशाही प्रक्रियेस सुदृढ करणारा व दिशा दाखवणारा आहे. राज्य शासनाने ही निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही असे नमूद केले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे या निवडणुका लांबल्या होत्या. परिणामी पुणे शहराचा कारभार प्रशासकांकडून चालवला जात होता, जो केवळ तात्पुरता पर्याय असतो.
लोकशाहीची खरी ताकद ही जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमध्ये असते. अशा लोकप्रतिनिधींना त्यांच्या भागातील समस्या, गरजा आणि विकासाच्या दिशा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आता निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांनी आपले प्रतिनिधी निवडल्यास, शहराचा कारभार अधिक उत्तरदायित्वाने, पारदर्शकतेने व प्रभावीपणे पार पडू शकेल.
शिवसेना पक्ष या निर्णयाचे पूर्णतः समर्थन करतो, कारण स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाचे मजबूत पाया आहेत. महानगरपालिकेची कार्यक्षमता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळेच वाढू शकते.
यामुळे पुणे शहराचा सर्वांगीण विकास, नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे.
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा पुणे शहराच्या सेवेसाठी कटीबद्ध आहेत

