पुणे- महापालिकेतील पाणीपुरवठा प्रमुख यांच्या नियोजना अभावी मध्यंतरी पुण्यात आठवड्यातून १ दिवस पाणी कपात जाहीर केली . आज दुपारी उच्च न्यायालयाने सार्वजनिक संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश काढले आणि त्यानंतर काही तासातच पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा प्रमुख यांनी घुमजाव करत आठवड्यातून एकदा नियोजित केलेली पाणी कपात रद्द केली आहे. हा राजकीय घुमजाव निर्णय आहे कि वास्तववादी आहे हे मात्र ..खरे खोटे देवच जाणो
या संदर्भात मुख्य अभियंता १ स्वारगेट पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’
वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प झोनमधील असणाऱ्या धायरी, सनसिटी, वडगाव बु., हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्त नगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर इ. परिसरामध्ये पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि.०५/०५/२०२५ पासून विभागवार (रोटेशन) पद्धतीने पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन प्रसिद्ध करण्यात आले होते, तथापि खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे पुर्नअवलोकन करण्यात आले असून सदर उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता व संभाव्य पावसाळा कालावधी यांचा विचार करून पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणारी विभागवार (रोटेशन) पद्धतीने दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. या परिसरातील नागरिकांना या पूर्वीच्या नियोजनानुमार पाणीपुरवठा करण्यात येईल.

