
मुंबई, : टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या नाविन्यपूर्ण फंड ऑफ फंड योजनेचे उद्दिष्ट आर्बिट्रेज फंडचे कमी अस्थिरतेचे धोरण आणि उच्च गुणवत्तेच्या कॉर्पोरेट बॉन्ड्सची स्थिर संचय क्षमता यांचा समन्वय घडवून आणणे हे आहे. नवीन फंड ऑफर ५ मे २०२५ रोजी खुली होईल आणि १९ मे २०२५ रोजी बंद होईल.
देशांतर्गत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणारा हा ओपन एंडेड फंड ऑफ फंड कॉर्पोरेट बॉन्ड आणि इक्विटी आर्बिट्रेज रिटर्नवर मिळवलेले व्याज यांच्या संतुलित मिश्रणाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एक बहुउपयोगी सोल्युशन प्रदान करतो.
टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह एफओएफ दोन वर्षांच्या होरायझॉन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, जे स्थिर, संचय-उन्मुख आणि कर बचत सक्षम रिटर्न मिळवू इच्छितात. हा फंड जास्तीत जास्त ६५% टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाला आणि कमीत कमी ३५% टाटा आर्बिट्रेज फंडाला वाटप करतो, जो २ वर्षांचे होरायझॉन डोळ्यासमोर ठेवून ऋण स्थिरता आणि कर बचत सक्षम रिटर्न यांना एकत्र जोडतो.
टाटा आर्बिट्रेज फंड आपल्या १००% हेज्ड इक्विटी पोर्टफोलिओसह, अल्पकालीन स्थिर लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तर टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड निवडक कालावधी प्रबंधनासह, मिळवलेल्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करतो. फंड ऑफ फंड संरचनेंतर्गत हे मिश्रण, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवण्यात आल्यावर स्टॅन्डअलोन आर्बिट्रेज किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाच्या तुलनेत अधिक चांगल्या कर बचत क्षमतेसह एक संतुलित दृष्टिकोन प्रदान करतो.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री शैलेश जैन यांनी सांगितले, “वर्तमान वातावरणामध्ये जिथे ऋण कमाई आकर्षक आहे आणि इक्विटी बाजारपेठेमध्ये अस्थिरता आहे, अशाप्रकारचे हायब्रिड धोरण पारंपरिक ऋण फंडांच्या तुलनेत अधिक जास्त कर-पश्चात रिटर्न देऊ शकते. फंडाचे सक्रिय वाटप आणि स्मार्ट लिक्विडिटी व्यवस्थापन रिटर्न अनुकूलित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.”
हल्लीच्या वर्षांमध्ये आर्बिट्रेज आणि हायब्रिड धोरणांकडे आकर्षण वाढत आहे कारण गुंतवणूकदार असे पर्याय शोधत आहेत ज्यामध्ये ऋण सुरक्षा आणि इक्विटी लिंक्ड उत्पादनांची कर बचत क्षमता व लवचिकता यांना एकत्र जोडले जाते.
टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड – रेग्युलर प्लॅनने एका वर्षात ८.३४% चे वार्षिक रिटर्न दिले आहे, तर याच कालावधीत क्रिसिल कॉर्पोरेट बॉन्ड ए-II इंडेक्सने ७.९७% रिटर्न दिले आहे. २०२१ मध्ये स्थापनेपासून फंडने ५.९६% चे रिटर्न दिले आहे (स्रोत: प्रेझेंटेशन). व्हॅल्यू रिसर्चनुसार, टाटा आर्बिट्रेज फंड – डायरेक्ट प्लॅन १ वर्ष आणि ५ वर्षांच्या एसआयपी रिटर्न दोन्हींसाठी आर्बिट्रेज फंडांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. १ वर्षाच्या एसआयपीवर ८.०५% आणि ५ वर्षांच्या एसआयपीवर ७.०६% रिटर्न दिले आहे.
टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंडच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ५००० रुपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीवर २ वर्षांनी इक्विटी टॅक्सेशन लाभ आणि ३० दिवसांनी रिडीम केल्यावर ०.२५% चा खूपच कमी एक्झिट लोड यांचा समावेश आहे.
टाटा ऍसेट मॅनेजमेंट गुंतवणूकदारांना खूप चांगल्या प्रकारे संशोधन करून तयार केलेली, नाविन्यपूर्ण सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी आपली वचनबद्धता मजबूत करत आहे, ही सोल्युशन्स बदलत्या बाजारपेठेचा वेग आणि दीर्घकालीन धन निर्मिती या उद्दिष्टांना अनुरूप आहे.

