बंद दाराआड झालेल्या बैठकीच्या काही तास आधी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की – “भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. मी दोन्ही देशांच्या सरकारांचा आणि नागरिकांचा आदर करतो आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत दोघांच्याही योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. अशा परिस्थितीत, त्यांचे परस्पर संबंध इतक्या धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहेत हे पाहून मला दुःख होत आहे.”

