पुणे- पहाटेच्या सुमारास भरधाव जाणार्या मर्सिडीज कारने नवले पुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवरील पडली. ही कार नेमकी सर्व्हिस रोडवरुन जात असलेल्या दुचाकीवर पडली. त्यात दुचाकीवरील सहप्रवासी याचा मृत्यु झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे मर्सिडीज कारमधील एअरबॅगमुळे चालक व इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
हिट अँड रनचा प्रकार पुण्यातील नवले ब्रीज जवळ घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत एका मर्सिडीज (एमएच ०१ बीके ४६२५) कारचालकाने रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिल्याने कुणाल हुशार (रा. चिंचवड,पुणे) या तरुणाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. संबंधित कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आराेप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
या अपघातातबाबत पाेलिस उपायुक्त संभाजी पाटील यांनी सांगितले की, शनिवारी पहाटे साडेचार वाजता बंगळुरु -पुणे महामार्गावर वडगाव ब्रीज जवळ विशाल हाॅटेल समाेर एका भरधाव वेगात असलेल्या मर्सिीडीज कारची स्प्लेंडर दुचाकीला जाेरात धडक बसली. या अपघातात माेटारसायकल चालकाचा दुर्देवीरित्या मृत्यु झाला असून त्याचा सहकारी जखमी झाला आहे. या अपघातानंतर मर्सिडीज कार वडगाव ब्रिजवरील बॅरिकेड ताेडून खाली असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर पडली. मर्सिडीज कारचे यात माेठे नुकसान झाले असले तरी कार मधील एअरबॅगमुळे चालक आणि मर्सिडीज मधील इतर प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.
याप्रकरणी आराेपींची वैद्यकीय चाचणी पाेलिसांनी केली असून त्यांच्यावर बीएनएस (सदाेष मनुष्यवध) कलम १०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींना ताब्यात घेण्यात आले असून दाेन आरोपी जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

