Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

२ हजार कोटीची गुंतवणूक: गोदरेजसिटी,पनवेल येथे चित्रपट, दूरदर्शन आणि मीडिया कॅम्पस उभारणार

Date:

गोदरेज फंड मॅनेजमेंट आणि शासनातर्फे WAVES मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी

2,000 कोटी रु. च्या प्रस्तावित गुंतवणुकीसह अंदाजे 2500 रोजगारनिर्मितीची क्षमता
 साधारण 10 एकर भूखंडावर सुमारे 500 कोटी रु. ची फेज 1 गुंतवणूक
मुंबई, 02 मे 2025:
गोदरेज फंड मॅनेजमेंटने WAVES समिट 2025, मुंबई येथे महाराष्ट्र
शासनासोबत एक सामंजस्य करार (MoU) केला. या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश
जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि शाश्वततेच्या मानकांनुसार अत्याधुनिक चित्रपट
आणि मीडिया कॅम्पस विकसीत करून महाराष्ट्रात कला, माध्यम आणि दूरचित्रवाणी क्षेत्राच्या
वाढीस चालना देणे हा आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत, महाराष्ट्र शासन गोदरेज फंड मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट
अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडला कॅम्पस विकासासाठी राज्य शासनाच्या विद्यमान धोरणे,
नियम आणि कायद्यांनुसार संबंधित राज्य विभागांकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी,
मान्यता आणि वित्तीय सवलती मिळवण्यासाठी सहाय्य करेल.
गोदरेज सिटी, पनवेल या एकात्मिक गोल्फ टाउनशिपमध्ये असलेल्या या कॅम्पसमध्ये AA
स्टुडिओज असतील. अत्याधुनिक सोयीसुविधा व जागतिक दर्जाच्या निर्मिती सुविधा पुरवत हे
कलाकार, संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचे केंद्र ठरेल. या केंद्राच्या
डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून ते नवीनतम तंत्रज्ञान, AI
यांसारख्या प्रणालींनी सुसज्ज आहे. कुशल मनुष्यबळासह जगातील सर्वात मोठा आशय
निर्मिती देश म्हणून भारताला या स्टुडिओद्वारे स्थानिक प्रतिभेचा उपयोग करून
कथाकथनातील उत्कृष्टतेकडे वाटचाल करता येईल. या सुविधेमुळे आशय निर्मिती,
हॉस्पिटॅलिटी आणि तांत्रिक सेवा क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती होऊन लक्षणीय आर्थिक प्रभाव
निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पर्यटन आणि परकीय चलन यांना चालना मिळेल.
यामुळे भारत सरकारच्या परदेशी चित्रपट निर्मितीसाठीच्या प्रागतिक प्रोत्साहन धोरणाचा लाभ
घेता येईल.या विकासामुळे पूरक उद्योगांनाही चालना मिळेल आणि पनवेल हे सर्जनशील उद्योजकता
आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एक सक्षम केंद्र म्हणून उदयास येईल. हे विकासकार्य मुंबई
3.0 या पुढारलेल्या नागरीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे
आणि राज्यभर आर्थिक विकासाला गती देण्याच्या दिशेने आहे.
गोदरेज फंड मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण
बोलारिया म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे नवकल्पना, सर्जनशीलता आणि रोजगारास चालना
देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबतची एक अर्थपूर्ण भागीदारी आहे. मुंबई 3.0 च्या दृष्टीकोनाशी
सुसंगत जागतिक प्रतिभेला आकर्षित करणारी, स्थानिक सर्जनशील लोकांना सक्षम करणारी
आणि पनवेलला सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र बनवणारी एक गतिशील परिसंस्था
उभारण्याचा आमचा उद्देश आहे.”
गोदरेज सिटी, पनवेल ही 145 एकरमध्ये पसरलेली एक स्वयंपुरक गोल्फ टाउनशिप असून
तिथे 30 एकरच्या 9-होल गोल्फ कोर्सचा समावेश आहे. या विकास प्रकल्पात नामांकित
शाळा, आरोग्य सेवा, व्यावसायिक क्षेत्र आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सचा
समावेश आहे. ही जागा दळणवळणाच्या सोई सुविधा यांच्या अनुषंगाने अत्यंत अनुकूल असून
आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून केवळ काही
मिनिटांच्या अंतरावर आहे. अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) यामुळे दक्षिण मुंबईपर्यंतचा
प्रवासाचा कालावधी आणखी कमी होतो. निसर्गसौंदर्य आणि शहरी पायाभूत सुविधांचा परिपूर्ण
संगम असल्याने ही जागा चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि विविध व्यावसायिक निर्मितींसाठी
आदर्श स्थळ आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...