विमानप्रवासातील सेवा आणि मनोरंजनात्मक सोयींची दखल
गुरुग्राम, २ मे २०२५ – जागतिक विमानसेवा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एअर इंडियाला नुकतेच दोन नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले.ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कार आणि पॅक्स रिडरशिप पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसह एअर इंडियाचा सन्मान करण्यात आला. ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कारांमध्ये एअर इंडियाच्या विस्ता व्हर्व्हला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. बिझनेस क्लासमध्ये ग्राहकांना जेवण देण्यासाठी वापरण्यात येणा-या भांड्यांसाठी हा सुवर्ण पुरस्कार दिला गेला. कंपनीच्या विस्ता या विमानप्रवासातील ग्राहकांच्या मनोरंजन प्रणालीला पॅक्स रिडरशिप पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ हा पुरस्कार मिळाला.
द ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कार २०२५मध्ये बिझनेस क्लासमधील जेवण देण्यासाठी दिल्या जाणा-या भांड्यांसाठी सुवर्ण पुरस्कार प्राप्त
ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कारांमध्ये एअर इंडियाला बिझनेस क्लामधील ग्राहकांना जेवणासाठी दिल्या जाणा-या भांड्यांसाठी यंदाचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. हॅम्बर्ग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. एअर इंडिया आपल्या ग्राहकांसाठी खासकरुन विस्ता व्हॅव्ह भोजनची आखणी तयार केली आहे. या भोजनाच्या व्यवस्थापनाचा या पुरस्कारामुळे सन्मान झाल्याचे एअर इंडियाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. या भोजनाच्या आयोजनात खालील गोष्टींचा समावेश होतो. –
- भारतीय जेवणासाठी मंडल डिझाइनमधील खास चिनी मातीची भांडी.
- स्लोव्हाकियामधील शिसे-मुक्त काचेची भांडी.
- स्टनलेस स्टीलची कटलरी. यातील चाकू-चमचे पोकळ हॅण्डलचे आणि वजनाने हलके असतात.
- जेवणात मीठ किंवा मिरपूड हवी असल्यास या भोजन साहित्यात सोनेरी रंगाचे भारतीय डिझाइन्सचे आकर्षक सेट उपलब्ध असतात.
- संपूर्ण मांडणीला पूरक अशी विचारपूर्वक तयार केलेले टेबल क्लॉथ.
द पॅक्स रिडरशीप पुरस्कारांमध्ये विस्ता प्रणालीसाठी सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ पुरस्कार
विमानप्रवासात ग्राहकांचे मनोरंजन व्हावे म्हणून एअर इंडियाने मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी प्रणाली म्हणून विस्ता ही सेवा पुरवली आहे. या प्रणालीला द पॅक्स रिडरशिप पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया पुरस्कार मिळाला आहे. विस्ता या प्रणालील ग्राहकांना खालील सोयींची उपल्बधता केली जाते.
- १४ जागतिक भाषांमधील प्रसिद्ध सिनेमांचा खजाना. या सिनेमांतून प्रवाशांचे २ हजार २०० तास मनोरंजन होईल एवढा संग्रह उपलब्ध आहे.
- ८ भारतीय भाषांमधील २५० सिनेमांचा संग्रह.
- भारतीय, पाश्चिमात्य आणि आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिकांचे ९०० हून अधिक भाग उपलब्ध.
- सुमारे १ हजार तासांचे ऑडिओ मनोरंजन
ग्राहकांना या सर्व सोयीसुविधा एअर इंडियाच्या एअरबस ए३५०च्या विमानांमध्ये उपलब्ध आहेत. एअरलाइन्सच्या विस्तारीत ताफ्यातही या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत. या सुविधांमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या ग्राहकांचा विमान प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास एअर इंडियाने व्यक्त केला.
या व्यतिरिक्त एअर इंडियाचा विस्ता स्ट्रीम ही वायरलेस स्ट्रीमिंग सुविधा देशांतर्गत विमानसेवा देणा-या विमानांमध्ये उपलब्ध असते. या सुविधांमध्ये खालील सोयी उपलब्ध असतात. –
· जागतिक सिनेमांचा संच. या संचाचा वापर करुन ग्राहकांचे ८९० तासांपेक्षा जास्त काळ मनोरंजन होते.
· ८ भाषांमधील १७० हून अधिक भारतीय चित्रपट.
· खास मुलांसाठी ३० तासांपेक्षाही जास्त काळाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम
० १ हजार तासांपेक्षा जास्त ऑडिओ मनोरंजनाचा खजिना
विस्ता आणि विस्ता स्ट्रीम या दोन्ही प्रणाली एअर इंडियाच्या ग्राहकांचा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास सुखकर करते.
हे पुरस्कार एअर इंडियाच्या विहान एआय या उपक्रमांतर्गत सुधारित सुविधांची पोहोचपावती आहे. जागकिक मानांकनानुसार एअरलाइनचा ब्रॅण्ड सुधारणे, सेवांमध्ये सुधारणा घडवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

