पुणे-द पिनॅकल ग्रुप व द नेचर मुकाईवाडी पुरस्कृत मास्टर्स कप 2025क्रिकेट स्पर्धेत 56 माजी अव्वल महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर 3 व 4 मे 2025रोजी रंगणार आहे.
स्पर्धेत संजय कोंढाळकर इलेव्हन, रियाज बागवान इलेव्हन, श्रीकांत जाधव इलेव्हन, श्रीकांत कल्याणी इलेव्हन, शंतनू सुगवेकर इलेव्हन आणि विनायक द्रविड इलेव्हन हे सहा संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेतील सहभागी संघामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंमध्ये शंतनू सुगवेकर, प्रसाद प्रधान, श्रीकांत कल्याणी, संजय कोंढाळकर, नितीन फडतरे, रणजित खिरीड, कौस्तुभ कदम, मृगांक राठी, करण थापा, सत्येन लांडे, रियाज बागवान, इंद्रजीत कामतेकर, अजय चव्हाण, संजय झरेकर, सुधीर देवदास, जयदीप नरसे, चंदन गंगावणे, विजय संगम, श्रीकांत जाधव, प्रसाद कानडे, कौशिक आफळे, सुनंदन लेले, शाम ओक, अनिल वाल्हेकर, रूपक मुळ्ये, प्रभाकर मोरे, राहुल कानडे, अमेय श्रीखंडे, हेमंत आठले, गिरीश कुलकर्णी, अजय नलावडे, नितीन सामल, नितीन हार्डीकर, रोहित खडकीकर, मंगेश वैद्य, विशाल मेहता, पराग चितळे, सुभाष रांजणे, आनंद दळवी, विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, प्रशांत खराडे, पराग शहाणे, अपूर्व साने, मंदार दळवी, गजानन राडकर, राजेंद्र मनोहर यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने प्रत्येकी 10 षटकाचे असणार असून सामन्यात विकेट पडल्यास संघाच्या धावसंख्येतून प्रत्येक विकेट मागे 5धावा वजा करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 35 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी 10 हजार रुपये व करंडक आणि मालिकावीर खेळाडूला करंडक व 15 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सामनावीर खेळाडूला करंडक व 5 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये मनीष साबडे, आशुतोष सोमण, विनायक द्रविड व इंद्रजीत कामतेकर यांचा समावेश आहे.

