पुणे-गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाचे पाेलिस निरीक्षक सुर्दशन गायकवाड, सहाय्यक पाेलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पथक हे शहरात गस्त घालत असताना, पुणे रेल्वे स्टेशन गेटसमाेर त्यांना दाेन संशयित व्यक्ती मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन सखाेल चाैकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सहा लाख २४ हजार रुपये किंमतीचा ३० किलाे गांजा हा अंमली पदार्थ मिळून अाला अाहे.
याप्रकरणी पप्पु चक्रधर देवरी (वय- ३२,रा. कलंड, ता.रसलपुर, जि.जसपुर, अाेरिसा) व चंदन सुभाष कुंवर (१९,रा. जगतपुर, जि.कटक, अाेरिसा) यांना अटक करण्यात अाली अाहे. त्यांच्या विराेधात बंडगार्डन पालीस ठाण्यात एनडीपीसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. चाैकशीत त्यांचा तिसरा साथीदाराचे नाव निष्पन्न झाल्याने दिपक बहिरा ऊर्फ बलिया (रा. भुवनेश्वर, अाेडिसा) याचे विराेधात देखील गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्याच्याकडून अाराेपींनी गांजा विक्रीस अाणला अाहे. ते नेमके पुण्यात काेणास अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी अाले हाेते. त्यांचे अन्य साथीदार काेण अाहे याबाबत पाेलीस पुढील चाैकशी करत अाहे.
दुसऱ्या घटनेत अंमली पदार्थ पथक दाेनचे पथक खडकी पाेलीस स्टेशनचे हद्दीत पेट्राेलिंग करत असताना, त्यांना नॅशनल टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स वाकडवेडी , एसटी स्टॅण्ड जवळ खडकी याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर एक संशयित व्यक्ती अल्पवयीन मुलासाेबत मिळून अाला. त्याच्या जवळील सामानाची चाैकशी करुन तपासणी केली ैसता त्यात सात लाख चार हजार रुपये किंमतीचे ३४ किलाे गांजा मिळून अाला अाहे. याप्रकरणी राकेश रुपसिंग पावरा (वय- २५,रा. शिरपुर, दापचेपाडा, धुळे ) याला अटक करण्यात अाली असून त्याच्या साेबतचा १७ वर्षीय धुळे येथील विधीसंघर्षिीत मुलास ताब्यात घेण्यात अाले. त्यांच्या विराेधात खडकी पाेलीस ठाण्यात अंमली पदार्थ विराेधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
वाकड परिसरातील कावेरीनगर भाजी मंडई जवळ वाकड पाेलीसांनी एक संशयित तरुणाला ताब्यात घेतले अाहे. त्याच्या ताब्यातून एक लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ११०० ग्रॅम गांंजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात अाला अाहे. सदर अंमली पदार्थ हा अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या विक्री करिता कब्जात बाळगल्याने अाराेपी अभिषेक सिध्दराम माैसलगी (वय- २१,रा. लक्ष्मणनगर, थेरगाव,पुणे, मु.रा. तिरुमालनिवास, गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक करण्यात अाली अाहे. त्याच्या विराेधात पाेलीस शिपाई समाधान तुकाराम कांबळे (वय- २९) यांनी वाकड पाेलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला अाहे.

