पुणे १ मे २०२५ : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) येत्या दि. ४ मे रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२५ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोशन एज्युकेशन या संस्थेने एक भव्य मॉक टेस्ट आयोजित केली. ही सिम्युलेशन परीक्षा केवळ कोटा येथेच नव्हे तर एकाच वेळी देशभरातील ८० शहरांमध्ये पार पडली. ‘नीट’ची तयारी करणाऱ्या ८,००० विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला.
कोटामध्ये ही मॉक टेस्ट दुपारी २ ते ५ या वेळेत घेण्यात आली. नीट परीक्षेच्या प्रत्यक्षातील वेळापत्रकाशी ती जुळणारी होती.
‘मोशन एज्युकेशन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन विजय यांनी वैयक्तिकरित्या परीक्षा केंद्रांना भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले, “नीट-यूजी २०२५’च्या नवीन परीक्षापद्धतीप्रमाणे आणि अपेक्षित काठिण्यानुसार ही मॉक टेस्ट आमच्या वरिष्ठ प्राध्यापकांनी अत्यंत काटेकोरपणे तयार केली आहे.”
संस्थेचे संयुक्त संचालक आणि नीट विभागप्रमुख अमित वर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले, “नवीन टॉपिक्स सुरू करण्यापेक्षा दिलेल्या वेळेत पेपर सोडवण्याचा सराव करा. तीन तासांत १८० प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित करा आणि प्रत्येक चाचणीनंतर आपल्या चुकांचे सखोल विश्लेषण करा. संकल्पना समजण्यातील अडचणी, दुर्लक्ष, लिखाणातील चुका किंवा वेळेचे व्यवस्थापन अशा ज्या कारणांनी चुका होत आहेत, त्या ओळखा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या तयारीच्या काळात तणावमुक्त रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या.”
शुभ्रा सिंग ही या मॉक टेस्टमध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी म्हणाली, “ही मेगा मॉक टेस्ट खऱ्या नीट परीक्षेचे वातावरण निर्माण करीत होती. आमची तयारी किती झाली आहे, हे समजण्यास या टेस्टमुळे मदत झाली आणि वेळेचे नियोजन सुधारायला संधी मिळाली.”
राजीव कुमार हा विद्यार्थी म्हणाला, “अशी वास्तव परीक्षेसारखी चाचणी देणे म्हणजे खरी परीक्षा कशी असते, हे समजून घेणे आणि त्या तणावाचा सामना कसा करावा हे शिकणे. ही एक अत्यंत उपयुक्त तयारी ठरली.”

