· दिल्ली ते टोक्यो हानेडा विमानसेवेची फ्रीक्वेन्सी चार साप्ताहिक फ्लाइट्सवरून सातवर नेणार
गुरुग्राम, २९ एप्रिल २०२५ – एयर इंडिया, या भारताच्या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने दिल्ली ते टोक्यो हानेडादरम्यानच्या नॉन- स्टॉप सेवेचा विस्तार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आठवड्यातील चार विमानसेवा १५ जून २०२५ पासून रोज सुरू होणार आहेत. यामुळे भारत व जपानमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवाशांची जास्त सोय होईल तसेच दोन्ही देशांतील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.
एयर इंडियाने ३१ मार्च २०२५ रोजी टोक्यो हानेडा विमानतळावर सेवा (नरितावरून) स्थलांतरित केली होती. यामुळे टोक्यो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ अंदाजे ३० मिनिटांनी कमी झाला होता. दैनंदिन विमानसेवा एयर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर एयरक्राफ्टद्वारे दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना मध्य टोक्योला लवकर पोहोचता येईल, कारण हानेडा विमानतळ डाउनटाउन टोक्योपासून केवळ १८ मिनिटांवर आहे.
‘दिल्ली- टोक्यो हानेडा सेवेचा विस्तार करून दैनंदिन सेवा पुरवण्यातून एयर इंडियाची भारत आणि जपानमधील प्रवासाची वाढती मागणी पुरवण्यासाठीची बांधिलकी दिसून येते,’ असे एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले. ‘ही दैनंदिन सेवा आणि सर्व निप्पॉन एयरवेजसह असलेली आमची कोडशेयर भागिदारी यांमुळे प्रवाशांना जपानमध्ये प्रवास करणे तसेच टोक्योखेरीज देशातील इतर ठिकाणी सहजपणे पोहोचणे शक्य होणार आहे.’
एयर इंडियाने स्टार अलायन्स पार्टनर ऑल निप्पॉन एयरवेजसह (एएनए) केलेल्या विस्तारित कोडशेयरमुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना टोक्यो हानेडापासून सहा प्रमुख जपानी शहरांत – फुकुओका, हिरोशिमा, नागोया, ओकिनावा, ओसाका आणि सपोरो एकाच तिकिटावर आणि प्रवासाच्या अंतिम ठिकाणासाठी बॅगेज चेकसह प्रवास करता येणार आहे.
दैनंदिन विमानसेवेमुळे देशांतर्गत भारतीय ठिकाणी – अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता आणि पुणे तसेच आशिया व युरोपमधील आंतरराष्ट्रीय मार्गांवर सहजपणे सेवा मिळणार आहे.
१५ जूनपासून लागू होणारे अद्ययावत विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
- AI358: दिल्लीपासून निर्गमन (DEL) 2020 वाजता, टोक्यो हानेडा (HND) येथे दुसऱ्या दिवशी 0755 वाजता आगमन (रोज).
- AI357: टोक्यो हानेडापासून निर्गमन (HND) 1150 वाजता दिल्ली (DEL) येथे 1725 वाजता (daily) आगमन.
एयर इंडियाच्या दिल्ली- टोक्यो हानेडा विमानसेवेचे बुकिंग सर्व चॅनेल्सवर खुले असून त्यात संकेतस्थळ Air India’s website,, मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्सचा समावेश आहे.

