पुणे, २८ एप्रिल २०२५:
वर्ल्ड हेरिटेज डे (१८ एप्रिल) आणि रेडिओ मिर्ची पुणेच्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणेकरांसाठी एक खास हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला — ज्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शनिवार सकाळी, हा वॉक त्रिशुंड गणपती, जुना किल्ला, गुंडाचा गणपती, कसबा गणपती मार्गे लाल महाल येथे संपन्न झाला. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ प्रसाद तारे आणि त्यांच्या टीमने हा वॉक मार्गदर्शित केला आणि पुण्याच्या समृद्ध इतिहासातील अनेक अदमास न लागलेली माहिती उलगडून दाखवली. या हेरिटेज वॉकमध्ये सुमारे ३५ पुणेकरांनी सहभाग घेतला आणि पुण्याचा ऐतिहासिक वारसा नव्याने नुभवला.
भाग घेणाऱ्या काही पुणेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या:

- अमित चव्हाण म्हणाले, “मी जन्माने पुणेकर आहे पण कसबा पेठेत किल्ला आहे हे मला आजवर माहीतच नव्हतं. एकदम डोळे उघडणारा अनुभव!”
- राहुल बुलबुले, एक अनुभवी प्रवासी, म्हणाले, “इथे वाढलो तरी आज अनेक नवीन गोष्टी कळल्या.”
- श्रावणी, एक विद्यार्थीनी, म्हणाली, “पाठ्यपुस्तकात जे वाचलं होतं ते आज खरंखुरं अनुभवता आलं!”
ही संपूर्ण संकल्पना आरजे उत्सवी आणि आरजे निधी यांनी पुढाकाराने राबवली, ज्यांना मिर्ची टीमचे दर्शन, केतन आणि रक्षित यांनी साथ दिली.

