युजर्सना पाच विश्वासार्ह कॉन्टॅक्ट्सना रियल- टाइम अप्रुवलसह युपीआय अॅक्सेस देता येणार
मुंबई – एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ
इंडियाच्या (एनपीसीआय) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आज युपीआय सर्कल विथ पार्शियल डेलिगेशन ही सेवा भिम
अॅपवर लाँच केली आहे. या सेवेमुळे युजर्सना सुनिश्चित मर्यादा व संपूर्ण पारदर्शकता राखत विश्वासार्ह व्यक्तींना युपीआय
व्यवहार करण्याचे अधिकार देता येतील.
युपीआय सर्कलमुळे प्रायमरी युजर, युपीआय खातेधारकाला पाच सेकंडरी युजर्सना त्यांच्या खात्यातून युपीआय पेमेंट
करण्याचे अधिकार देता येणार आहेत. सेकंडरी युजरला प्रत्येक व्यवहार करण्यासाठी त्यांच्या प्रायमरी युजरकडून खास
अप्रुवल त्यांच्या युपीआय पिनद्वारे नव्या भिम अॅपवर घ्यावी लागणार आहे. सेकंडरी युजर्सद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार
प्रायमरी युजरला त्यांच्या नव्या भिम अॅपवर रियल टाइम पाहाता येतील आणि पर्यायाने पारदर्शकता कायम ठेवत
देखरेख करता येईल.
या सुविधेच्या लाँचविषयी एनबीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ललिता नटराज
म्हणाल्या, ‘भिमवरील युपीआय सर्कल ही केवळ एक सुविधा नाही, तर ते सर्वसमावेशक आणि कनेक्टेड आर्थिक यंत्रणा
उभारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आर्थिक जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याचा सुरक्षित व लवचिक मार्ग उपलब्ध
करत युपीआय सर्कलने आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करून एकमेकांशी जोडलेला समाज उभारणीचा मार्ग खुला
केला आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सुविधेसह आम्ही डिजिटल पेमेंट्स यंत्रणा प्रत्येकासाठी अधिक उपयुक्त व
सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टासाठी महत्त्वाचे योगदान देत आहोत.’
त्याशिवाय युपीआय सर्कलद्वारे युपीआय- लिंक्ड बँक खाती नसलेल्या लोकांमध्ये आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना
मिळावी यासाठी विश्वासार्ह युजरकडून पेमेंट रिक्वेस्ट करता येणार आहे. त्या युजरला नव्या भिम अॅपवर रियल टाइम हे
व्यवहार अप्रुव करता येईल.
महत्त्वाचे लाभ
ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर – ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याद्वारे अधिकृतता देऊन त्यांच्या वतीने
प्रत्येक पेमेंटला अप्रुवल देता येईल. बरेचसे ज्येष्ठ नागरिक डिजिटल पेमेंट सुविधा वापरताना कचरतात आणि यामुळे
त्यांना विश्वासार्ह व सुरक्षितपणे व्यवहार करता येतील.
तरुण मुलांना सक्षम करणारे : पालकांना त्यांच्या तरुण मुलांना त्यांचे दैनंदिन किंवा शैक्षणिक खर्च नियंत्रित,
मर्यादित अक्सेससह आणि सुरक्षेबाबत तडजोड न करता रियल टाइम अप्रुवलसह करण्याची सोय देता येईल.
लहान व्यवसायांसाठी सुरक्षित डेलिगेशन – व्यवसाय मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना रोजच्या खर्चाची पेमेंट्स
करण्याचे अधिकार देता येतील. उदा. इंधन, टोल किंवा व्हेंडर पेमेंट्स, रोख पैसे न हाताळता त्यांना जबाबदारी देणे
मालकांना शक्य होईल.
डिजिटल सुविधांचा अनुभव नसलेल्यांसाठी मदतीचे – नोकरदार व्यावसायिकांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना
किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सची पुरेशी माहिती नसलेल्यांना रियल- टाइम मॉनटरिंग व अप्रुवलद्वारे पेमेंट करण्याची
सोय देता येईल.
युपीआय सर्कल नव्या भिम पेमेंट्स अॅपच्या अद्ययावत व्हर्जनवर (४.०.२ व्हर्जन) अपग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आले
आहे. त्याशिवाय यामध्ये स्पिल्ट एक्सपेन्सेस, फॅमिली मोड, स्पेंड्स डॅशबोर्ड, मल्टीलिंग्वल सपोर्ट आणि युजरसाठी नवीन
अनुभव यांचा समावेश आहे. भारत का अपना पेमेंट्स अॅप ही भूमिका निभावण्यासाठी आणि भारताच्या डिजिटल
स्थित्यंतरासाठी सुरक्षित, व्यापक, सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे.
भिमवर युपीआय सर्कल कसे वापरावे
- भिम अॅपओपन करा आणि होम स्क्रीन किंवा मेन्यूमध्ये युपीआय सर्कल सेक्शनमध्ये जा.
- ‘अॅड सेकंडरी युजर’वर टॅप करा आणि त्यांचा युपीआय आयडी द्या किंवा क्यूआर कोड स्कॅन करा.
- डेलिगेशन टाइपमध्ये ‘अप्रुव एव्हरी पेमेंट’ (पार्शियल डेलिगेशन) निवडा.
- सेकंडरी युजरला रिक्वेस्ट येईल. इन्व्हाइट स्वीकारल्यानंतर त्यांना प्रायमरी युजरच्या खात्याचा वापर करून पेमेंट्स
करता येतील व भिम अॅपद्वारे प्रायमरीला रियल- टाइममध्ये पेमेंट अप्रुव करण्याची रिक्वेस्ट पाठवता येईल.

