पुणे:रेल्वे हेल्थ युनिट, घोरपडी, पुणे येथे सुधारित वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन राजेश कुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग आणि स्वाती वर्मा, अध्यक्षा, महिला सामाजिक सेवा संघटना पुणे विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि रुग्ण सुविधांमध्ये सुधारणा करणे आहे.या उन्नत सुविधांमध्ये कार्डियक डिफायब्रिलेटर, मल्टीपॅरा पेशन्ट मॉनिटर, मल्टीचॅनल ईसीजी मशीन, फाऊलर बेड्स, क्रॅश कार्ट, नेब्युलायझर आणि इतर आपत्कालीन उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय रुग्णांसाठी आरओ वॉटर कूलर, जनरेटर सेट, लस आणि औषधांसाठी रेफ्रिजरेटरचीही सोय करण्यात आली आहे.
या सुविधा टाटा ब्लूस्कोप स्टील प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत दिल्या आहेत. या नवीन सुविधांमुळे रुग्णांना इथे अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

