पुणे न्यायालयाने वि.दा. सावरकर यांच्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. लंडन दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोर्टाने 9 मे रोजी राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत.
दरम्यान राहुल गांधींनी लंडन येथील एका कार्यक्रमात विनायक सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यासंदर्भात पुणे न्यायालयाने 9 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींना कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान वि.दा. सावरकर हे इंग्रजांचे सहकारी होते आणि त्यांना इंग्रजांकडून निवृत्तिवेतन मिळत होते या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. सावरकरांवर राहुल गांधी ‘बरळल्यास’ आता सुप्रीम कोर्ट स्वत: कारवाई करेल. इतिहास जाणून न घेता वक्तव्य करू नका. तुम्ही राजकीय पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रात सावरकरांची पूजा केली जाते. त्यामुळे सावरकरांवर बोलू नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

