पश्चिम भारतातील 87% लोक डासांमुळे त्रस्त ; जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवरगुडनाईट सर्वेक्षण

Date:

–      सर्व वयोगटांतील सुमारे 61% प्रौढांनी डासांचा त्रास याला अस्वस्थ झोपेसाठीच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हटले आहे

–      प्रौढ दररोज रात्री 2 तासांपर्यंतची झोप गमावतात; मुलं जवळजवळ 4 तास झोप गमावतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजाराचा धोका वाढतो

–      उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील 87% आणि दक्षिण भारतातील 86% लोक याच मताशी सहमत

मुंबई: झोपेमधील अडथळे, विशेषतः मुलांना झोपेत येणारा व्यत्यय त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर थेट परिणाम करत आहे अशी पश्चिम भारतातील 87% लोकांची खात्री आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या (25 एप्रिल) पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या गुडनाईट या भारतातील आघाडीच्या घरगुती कीटकनाशक ब्रँडने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. गुडनाईटने ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ या नावाने सादर केलेले हे अखिल भारतीय सर्वेक्षण YouGov या मार्केट रिसर्च फर्मकडून राबविण्यात आले. यात जनतेची मतं आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका याचे मूल्यमापन केले गेले. सर्वच भागांमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली. उत्तर, पूर्व भारतात 87% आणि दक्षिणेत 86% प्रतिसादकर्ते याच मताशी सहमत आहेत.

या अभ्यासानुसार, झोपेची कमतरता हा भारतीय घरांमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. रोज रात्री प्रौढ लोक सुमारे 2 तास झोप गमावतात, तर मुलांची झोप त्यांना गरजेच्या असलेल्या वेळेपेक्षा जवळपास 4 तास कमी होते. ही सततची झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते, तणावाची पातळी वाढवते आणि विशेषतः मलेरिया व डेंग्यूसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांप्रती संवेदनशीलता वाढवते.

पश्चिम भारतातील प्रौढांमध्ये डास हे झोपेच्या व्यत्ययाचे एक प्रमुख कारण ठरले आहेत. विविध वयोगटांमध्ये सुमारे 61% लोकांनी डासांच्या प्रादुर्भावाला अस्वस्थ झोपेसाठी जबाबदार धरले आहे. मुलांमध्ये याचा परिणाम अधिक तीव्र असून, पालक सांगतात की डास चावणे व सतत त्यांची कानाशी होणारी भूणभूण हे झोपेमधील अडथळ्याचे प्रमुख कारण बनले आहे. हे आजार किंवा अभ्यासाच्या तणावापेक्षाही अधिक ठरते.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अश्विन मूर्ती म्हणाले, “गुडनाईटचा ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ हा एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण अहवाल असून तो जनतेच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करतो आणि डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या धोक्याचे मूल्यमापन करतो. अशा उपक्रमांद्वारे आमचे उद्दिष्ट म्हणजे भारतात डासांच्या समस्येबाबत जनजागृती वाढवणे, कुटुंबांना डासांचा अटकाव करण्यासाठी कृती करण्याकरता सक्षम बनवणे आणि देशासाठी परवडणाऱ्या पण नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करणे हे आहे. भारतात दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी ग्रासतात. आजारामुळे काम, शाळा, सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपासून लांब राहावे लागते, सक्तीची रजा घ्यावी लागते. आरोग्यसेवेसाठी खर्च करावा लागतो आणि उत्पादकतेत घट होते. हे सर्व आर्थिक नुकसानीचे कारण ठरतात. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि जीडीपी टिकवण्यासाठी एक सक्षम आणि निरोगी कामकाज करणारा वर्ग आवश्यक असतो. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे हे प्रश्न वेळेवर सोडवणे.”

फक्त थकवा नाही, तर झोपेच्या अभावाचे परिणाम दूरगामी असतात. वैद्यकीय तज्ज्ञ चेतावणी देतात की झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकते. त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांसह अनेक संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो. याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव वाढतो, चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.

गुडनाईटच्या अहवालावर भाष्य करताना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या, “एक डास देखील प्राणघातक रोग पसरवण्याची क्षमता ठेवतो हे समजणे अत्यावश्यक आहे. हे लहानसे कानाशी भूणभूण करणारे कीटक डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक रोगांच्या फैलावामागचे धोकादायक कारण आहेत. ते रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल करतात. त्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता वाढते. ही सततची भीती आपल्या आरोग्याला धोका पोहोचवते आणि निरोगी व उत्पादक जीवन जगण्याची क्षमता बाधित करते. डासांमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती आपली आणि आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”

गुडनाईटने फ्लॅश वेपोरायझर, अगरबत्त्या आणि अ‍ॅडव्हान्स फास्ट कार्ड यांसारख्या नाविन्यपूर्ण डास प्रतिबंधक उपाययोजना सादर करत एक दीर्घकालीन परंपरा जपली आहे. अलीकडच्या काळात बेकायदेशीर, अनियमित व चीनी घटक असलेल्या कीटकनाशकांमुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) मधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या भागीदारांसोबत मिळून ‘Renofluthrin’ हे भारतातील पहिले देशी बनावटीचे व पेटंट केलेले मॉलिक्यूल विकसित केले आहे. डास नियंत्रणासाठी हे सर्वात प्रभावी लिक्विड वॅपोरायझर फॉर्म्युलेशन तयार करते. GCPL हे घरगुती कीटकनाशक क्षेत्रात आघाडीवर असून  त्यांनी हे Renofluthrin फॉर्म्युलेशन त्यांच्या नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझरमध्ये सादर केले आहे. हे भारतातील सर्वात प्रभावी लिक्विड वेपोरायझर आहे. Renofluthrin वापरून तयार केलेले हे नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझर भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत लिक्विड वेपोरायझर फॉर्म्युलेशनच्या तुलनेत 2 पट अधिक प्रभावी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...