पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वर्ल्डबुक अँड कॉपीराईट डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचे प्रतिमा पूजनाने झाली. ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी या प्रसंगी वर्ल्डबुक अँड कॉपीराईट दिवसाचा इतिहास, महत्व सांगून जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचे साहित्याविषयी मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाचनासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून दिली. वर्ल्डबुक अँड कॉपीराईट दिनाची विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. ग्रंथालयात आलेल्या नवीन पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा.गणेश कोंढाळकर,ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी केले. महाविद्यालयाने हा उपक्रम राबविल्या बद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
वर्ल्डबुक अँड कॉपीराईट डे उत्साहात साजरा….
Date:

