पुणे: “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे, तर रमाई आंबेडकर त्यागाचे प्रतीक आहेत. रमाईंच्या त्यागाची साथ मिळाल्याने बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासह अनेक गोष्टींमध्ये भरीव योगदान देता आले. बाबासाहेबांचे संविधान आणि रमाईचा त्याग यातून प्रेरणा घेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा संविधानाला अभिप्रेत सरकार आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
पुणे स्टेशन येथील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाला हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, , माजी नगरसेविका लता राजगुरू, सुजित यादव यांच्यासह मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते ॲड. अविनाश साळवे यांच्या हस्ते हर्षवर्धन सपकाळ यांचा भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

