अक्षय्यऊर्जा वापराला चालना देण्यासाठी आयपीपींसोबत भागीदारी
पुणे: सुझलॉन स्वतंत्र ऊर्जा उत्पादक (IPPs) द्वारे मोठ्या कंपन्यांमध्ये अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवत आहे. याच माध्यमातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला आणि 2030 पर्यंत 500 GW नॉन-फॉसिल इंधन क्षमता साध्य करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला पाठिंबा देत आहे. या वचनबद्धतेला अधिक भक्कम करत, सुझलॉनने सनश्योर एनर्जीकडून 100.8 मेगावॅट ईपीसी पवन ऊर्जा ऑर्डर मिळवली आहे, ज्यामुळे पवन ऊर्जेमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील जत भागात राबवला जाणार आहे.
या करारांतर्गत, सुझलॉन 48 अत्याधुनिक S120 विंड टर्बाइन जनरेटर (WTGs) हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) सह पुरवेल. यासोबतच प्रत्येकी 2.1 मेगावॅट क्षमतेचे रेटिंग दिले जाईल. ते विंड टर्बाइन पुरवेल, बसवलेल्या उपकरणांचे निरीक्षण करेल आणि प्रकल्पाची अंमलबजावणी करेल, ज्यामध्ये त्याची उभारणी आणि कार्यान्वयन समाविष्ट आहे. कार्यान्वित झाल्यानंतर व्यापक ऑपरेशन्स आणि त्याची देखभाल देखील करेल. हा प्रकल्प सनश्योर एनर्जीच्या अक्षय्य ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये वाढ करेल आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील ग्राहकांना चोवीस तास वीज देण्याच्या त्यांच्या ध्येयाला पाठबळ देईल.
सुझलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जे.पी. चालासानी म्हणाले, “2030 पर्यंत भारताचे 500 गिगावॅट नॉन-फॉसिलचे इंधन लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी पवन ऊर्जा स्वीकारणे अत्यावश्यक आहे. पवन ऊर्जेचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून स्वतंत्र ऊर्जा उत्पादक (आयपीपी) त्याची ही क्षमता ओळखूनच वीज अधिक सुलभ, परवडणारी आणि उच्च दर्जाची बनविण्यासाठी पवन उर्जेला प्राधान्य देत आहेत. हे संक्रमण केवळ आमच्या ऊर्जा उद्दिष्टांना समर्थन देत नाही तर संपूर्ण उद्योगात शाश्वत आर्थिक वाढ आणि नवोपक्रमाला चालना देते.”
सुझलॉन ग्रुपच्या इंडिया बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक श्रीवास्तव म्हणाले, “भारताच्या अक्षय्य ऊर्जा संक्रमणाला चालना देणाऱ्या सनश्योर एनर्जीसोबत त्यांच्या पहिल्या पवन प्रकल्पात भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. देशातील अक्षय्य ऊर्जा चळवळीला चालना देण्यासाठी भारतातील असंख्य स्वतंत्र वीज उत्पादकांसोबत (आयपीपी) सहयोग करण्याचे आमचे ध्येय आहे.”
सनश्योर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी (सीसीओ) श्री. मनीष मेहता म्हणाले, “आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अक्षय्य ऊर्जा उपायांसह सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महाराष्ट्रात पवन ऊर्जेचा समावेश करण्यासाठी आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार केल्याने चोवीस तास आमच्या (आरटीसी) अक्षय्य ऊर्जा क्षमता वाढतील, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांच्या वीज वापराचा आणखी मोठा वाटा नैसर्गिक उर्जेसह भरून काढता येईल. हा प्रकल्प सनशुअर एनर्जीच्या अक्षय्य ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये विविधता आणतो आणि 2030 पर्यंत 10 गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुझलॉनसोबतची ही भागीदारी आम्हाला भारताच्या व्यवसायांसाठी सर्वात विश्वासार्ह स्वच्छ ऊर्जा उपाय तयार करण्यात आणि भारताच्या शाश्वत भविष्यासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यात मदत करेल.”

