ब्लॅक बॅाक्स क्रिएशन्स निर्मित “भय इथले संपत नाही” हा एक आगळावेगळा अभिवाचनाचा कार्यक्रम शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी भरत नाट्य मंदीर येथे सादर झाला. कथाकट्टाच्या कलाकारांनी या दोनअंकी प्रयोगामधे ४ भय व गूढ कथांचे नाट्यमय पध्दतीने अभिवाचन केले. या कार्यक्रमासाठी नारायण धारप, रत्नाकर मतकरी, राजीव तांबे आणि आशुतोष उकिडवे यांच्या उत्तम कथांची निवड केली होती. प्रभावी नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताचा परिणामकारक उपयोग यामुळे प्रेक्षकांना उत्तम नाट्यानुभव मिळाला. पात्रांच्या गरजेनुसार आकर्षक रंगभूषा आणि वेशभूषा केल्यामुळे त्या अनुभवामध्ये अधिक भर पडली. कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून नाट्यवाचन करत रसिकांना खिळवून ठेवले.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन श्री. देवेंद्र भिडे यांचे होते. तर मानसी जोगळेकर, वंदना गरगटे, पूजा गिरी, डॅा. समीर डोलारे, सिद्धी गंदीगुडे, पराग फडके, जन्मजेय खुर्जेकर, माधव सोमण, मधूर डोलारे, रेणुका भिडे, देवेंद्र भिडे, तन्वी गिरी, सचिन यंदे, अथर्व कुलकर्णी, आरोही डोलारे, अंतरा डोलारे यांचा सहभाग होता. प्रकाशयोजना योगेंद्र साने, संगीत संयोजन – निरंजन देशपांडे, रंगभूषा – नरेंद्र वीर यांचे होते.
या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. “भय इथले संपत नाही” चा पुढचा प्रयोग शुक्रवार २५ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा भरत नाट्य मंदीर येथे रंगणार आहे. तरी एक अनपेक्षित पध्दतीने भय व गूढ कथांचा नाट्यानुभव देणारा अभिवाचनाचा हा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक प्रेक्षकांनी जरूर हजेरी लावावी.

