Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी आयएमए तर सगळ्या आमदारांचे स्वीय सहायक भिसे यांच्या पाठीशी

Date:

पुणे- तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी तातडीचे उपचार आवश्यक असताना अनामत रकमे अभावी उपचार नाकारल्याचा आरोप असलेल्या दिनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. दिनानाथ रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्या पाठीशी डॉक्टरांच्या संघटना आणि खुद्द आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) असल्याचे स्पष्ट होत असताना आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक भिसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आता सगळ्या आमदारांचे स्वीय सहायक भिसे यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसून येते आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला. डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख डिपॉझिट मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.त्यामुळे महिलेला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याठिकाणी महिलेचा जीव गेला. या प्रकरणावरून घैसास यांच्यावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर घैसास यांनी राजीनामाही दिला होता. आता या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ घैसास यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले आहे. आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी स्पष्टीकरण देताना ऍडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केले असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस पाठवल्यावर त्या चौकशीमध्ये घैसास निर्दोष म्हणून सिद्ध होतील. या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असले तरी इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचे आयएमएने सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणे चूक असून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांची बाजू मांडली आहे.

कदम म्हणाले, डॉ घैसास यांनी गर्भवती महिलेला योग्य उपचार दिले होते. शिवाय ते देत असताना काही सूचनाही वेळोवेळी केल्या होत्या. महिलेला गर्भधारणा रिस्क असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच तुम्ही मुलं दत्तक घेण्याचा विचार करावा असा पर्यायही घैसास यांनी सुचवला होता. मात्र महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी हे ऐकले नाही. डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय संबंधित महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतले. जेव्हा महिलेची प्रकृती सिरीयस झाली तेव्हा सुद्धा घैसास यांनी महिलेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती.

डॉ. घैसास यांच्यावर पैसे मागितल्याचा जो आरोप होत आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. कौन्सिलने जरी त्यांना नोटीस पाठवली असली तरी चौकशीमध्ये ते निर्दोष म्हणून सुटतील. आम्ही महाराष्ट्र आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी घैसास यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला असून त्यांच्या पाठीशी असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले आहे.

सगळ्या आमदारांचे स्वीय सहायक भिसे यांच्या पाठीशी….

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात मोठा तनिशा भिसे प्रकरणावरून जन संताप निर्माण झाला. त्याचबरोबर मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांवरही दुसऱ्या बाजूने काही आरोप करण्यात आले होते.दरम्यान, या सगळ्या आरोपांचं भिसे कुटुंबीयांनी खंडन केलं आहे. ज्या रेशनकार्डवरून ट्रोल करण्यात आलं तेच रेशन कार्ड भिसे कुटुंबीयांनी माध्यमांना दाखवलं.

आमदाराच्या पीएला 30 हजार पेक्षाही कमी मानधन असतं. आमदाराचा पीए म्हणजे सगळे वाईट काम करणारा नसतो अनेक आमदाराचे पीए प्रामाणिक काम देखील करतात. वार्षिक उत्पन्न 300000 पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या स्वीय सहायकांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला आहे. आमदाराचा स्वीय सहाय्यक असला तरीही इमानदारीने काम करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे नसतात. ज्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात दहा लाख रुपये मागितले, त्यादिवशी आम्ही जागेवर तीन लाख रुपये द्यायला तयार होतो आणि सात लाख रुपयांची व्यवस्था आमदार अमित गोरखे हे करत होते, असंही भिसे कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

दीनानाथ रुग्णालयातही तनिषा भिसे यांच्या डिलिव्हरीची सगळी तयारी सुरु होती. त्यादिवशी अनेक मोठ्या लोकांनी दीनानाथ रुग्णालयात फोन केले होते आणि एवढे मोठे लोक फोन करत असेल तर त्यांनी पैशाची गॅरंटी घ्यायला हवी होती. या सगळ्या दरम्यान वारंवार आमचे मीडिया ट्रायल घेतले जात आहे. आम्हाला अनेकांकडून चौकशीसाठी बोलावलं जात आहे. सोबतच कुटुंबीयांना मानसिक त्रासातून देखील जावे लागत आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्स न्याय मागणाऱ्याला गुन्हेगार ठरवत आहेत आणि गुन्हेगाराला संरक्षण देत आहेत. आमच्या दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत. रुग्णालयाचे सीसीटीव्ही समोर आणले तर या सगळ्या गोष्टी सत्य आहे हे समोर येईल असंही ते म्हणाले.महाराष्ट्र शासन खूप चांगल्या पद्धतीने मदत करते आणि आम्हाला न्याय मिळेल यासाठी ही मदत करते. पण, आता ससूनचा अहवाल यावर उत्तर देणार आहेत आणि ससूनचा अहवाल तातडीने सादर करावा आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल का लांबवला जातोय, याचही उत्तर द्यावं आणि तोही अहवाल तातडीने सादर करून निश्चित कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी. डॉक्टर केळकर आणि दीनानाथ रुग्णालयाने जी काही पत्रकार परिषदेत माहिती दिली किंवा प्रसिद्धीपत्रक काढलं ते खोटं आहे. दीनानाथ रुग्णालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रात आमची बदनामी करण्यात आली आणि चार डॉक्टरांच्या अंतर्गत समितीने ही आमची बदनामी केली असा आरोपच या कुटुंबाने केला आहे.

सगळ्या कुटुंबीयांनी मिळून आयव्हीएफ करण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर घैसास यांनीच आम्हाला आयव्हीएफ करण्यासाठी विश्वास दिला होता. वहिनींना ओवरीमध्ये सीस्ट होतं आणि ते कधीच काढून टाकण्यात आलं होतं, त्याचा कोणताही आता त्रास होत नव्हता. डॉक्टरांनी आम्हाला मूल दत्तक घेण्याचा कोणताही सल्ला दिला नव्हता. तनिषा भिसे त्यांचे पती आणि संपूर्ण भिसे कुटुंब यांनी एकत्र मिळून आयव्हीएफ करण्याचा आणि मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला होता.

डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या पत्नीकडे आयबीएफ करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, विमान नगर मधील इंदिरा आयव्हीएफ सेंटरमध्ये IVF करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. आता प्रशासनाने मुद्दा न भरकटवता तातडीने निर्णय घेऊन सगळे अहवाल एकत्र आणून कठोरातील कठोर कारवाई करावी. आयव्हीएफबाबत आम्हाला यापूर्वी कोणतीही फार माहिती नव्हती, त्याची सगळी माहिती डॉक्टर घैसास यांनी दिली आणि त्यांनीच आयव्हीएफ करण्याचा सल्लाही दिला.

पोलिसांकडे आम्ही सगळे पुरावे दिले आहेत आणि ससून रुग्णालयाकडेही सगळे पुरावे आहेत त्यामुळे त्यांनी तातडीने कारवाई करण्यात आता गरजेचं आहे. यात सरकारने किंवा बाकी कोणीही वेळकाढूपणा करू नये आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य कुटुंबातील लोक आहोत आणि या सगळ्याला समोर जाणं आमच्यासाठी फार अवघड झाले आहे. रुग्णालयाने कुटुंबावर जे आरोप केले आहेत, त्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा रुग्णालयांना दिला नाही, असा दावा भिसे कुटुंबीयांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...